यातून आपलं योग्य-अयोग्य, चांगले वाईट गोष्टींवर मनात विचार चालतात यावर आपण आपल्या
मनाशी संवाद साधत असतो. मनाला अनेक प्रश्न विचारून काही प्रश्नांची उत्तरे शोधत
असतोत,जर चूक झालेली असेल तर त्या
चुकीच कारण काय किंवा ती चूक सुधारण्यासाठी उपाय कोणता ते शोधत असतो. त्यासाठी
अंतर्मुख होणे फार महत्त्वाचे असते, माणूस इतरांना फसवू शकतो ; पण स्वत:च्या मनाला कधीही फसवू शकत नाही हे आपल्याला माहीत
आहे... प्रत्येक मानवाने मनापासून हा विचार केला पाहिजे की जेणेकरून यातून आपल्या
समस्या सुटतील. आपण इतरांशी संवाद साधतच असतो पण स्वतःच्या मनाशी सुद्धा कधीतरी
संवाद साधला पाहिजे, कधीतरी हे अंतर कमी झालं
पाहिजे... प्रत्येकाने आपल्या मनासोबत वेळ घालवला पाहिजे.... स्वतःसाठी वेळ देणे व
त्यामध्ये स्वतःच्या चांगले वाईट यासाठी विचार करणे म्हणजे अंतर्मुख होणे .... कधी
कधी आपल्या मनात विचारांचे काहूर उठते, अनेक प्रश्नांचा भडीमार होतो, भविष्याचा वेध घेणारे प्रश्न, गतकाळातील गोष्टी..... न जाणे कोणकोणत्या प्रकारच्या गोष्टी
मनाला स्पर्श करून जातात.पण त्या प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी दुसऱ्यावर
अवलंबून राहणे कितपत योग्य आहे,तर हे पूर्णपणे चूक आहे. आपले निर्णय आपल्याला घ्यावे
लागतात... चूक असो अथवा बरोबर. दुसऱ्याच्या मदतीने आपण किती वेळा निर्णय घेणार...
आपले निर्णय आपणच घेणे योग्य असते, म्हणूनच आपल्या मनासोबत संवाद करणे गरजेचे असते. स्वतःचा -
स्वतःशी संवाद साधणे, अंतर्मुख होणे महत्वाचे
असते...... अंतर्मुख होऊन विचार केल्यास आपला आत्मविश्वास वाढतो.- लेखिका दुर्गा भगत {Hsc.D.ed, M.A.(His &
Eco) B.ed ,DSM}
0 Comments