बस आणि मोटारसायकल अपघातात मोटारसायकलस्वार ठार !


करंजी - पाथर्डी महामार्गावर करंजीपासुन एक किलोमीटर अंतरावरील अपुर्वा पेट्रोल पंपाजवळ आज दुपारी एस.टी. बस व मोटार सायकलच्या अपघातात मोटारसायकलस्वार भरत पागिरे हे जागीच ठार झाले.

आज दुपारी तिन वाजण्याच्या सुमारास भरत पागिरे (राहणार हल्ली भिंगार) हे कासार पिंपळगाव, पारेवाडी येथील आपल्या नातेवाईकास भेटुन परत येत असताना करंजी जवळील अपुर्वा पेट्रोल पंपासमोर समोरुन येणाऱ्या भिवंडी-गेवराई (गाडी क्रमांक एम एच-२०-बी एल-२८००) या बसबरोबर समोरासमोर धडक होऊन  मोटारसायकलस्वार भरत पागिरे हे जागीच ठार झाले. अपघात होताच बस चालक तेथुन फरार झाला.मयत भरत पागिरे हे माजी सैनिक होते. त्यांचे आगडगाव ता. नगर हे गाव होते. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांच्या पथकाने मदत केली. करंजी औटपोस्टचे हरिभाऊ द्रवीड, लाड यांनी पागिरे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाथर्डीला पाठवुन दिला. या अपघाताचा पाथर्डी पोलिस स्टेशनला उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.

Post a Comment

0 Comments