कडा - येथील सेवानिवृत्त शिक्षक दत्तात्रय कृष्णराव देशमुख गुरुजी यांचे शनिवारी सायंकाळी वृध्दापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे (वय-८१) होते.
दिवंगत देशमुख गुरुजी यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, दोन मुली, जावाई, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. रविवारी सकाळी देशमुख यांच्या शेतामध्ये शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी सर्वस्तरातील प्रतिष्ठीत नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments