कड्यात भिडेंची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून 'जोडे मारो' आंदोलन

 

कड्यात भिडेंची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून 'जोडे मारो' आंदोलन ,सर्वपक्षीय संघटनांकडून निषेध; देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी !

कडा / वार्ताहर - राष्ट्रपिता महात्मा गांधी, क्रांतीसुर्य महात्मा फुले, श्री संत साईबाबा या महापूरुषांबद्दल गरळ ओकून बदनामीकारक निरर्थक बेताल वक्तव्य करुन सामाजिक सलोखा धोक्यात आणू पाहणा-या मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडेंच्या निषेधार्थ प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढुन कड्यात विविध पक्ष संघटनांनी जोडे मारो आंदोलन करुन शासनाने भिडेवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली.

आष्टी तालुक्यातील कडा शहरात बुधवारी सकाळी राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रीय समाज पक्ष, आम आदमी पार्टी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मराठा सेवा संघ, शेतकरी कामगार पक्ष, शहीद टिपू सुलतान युवा मंच, शेतकरी संघटना, छत्रपती क्रांती सेना, एसआरपी, बहुजन वंचित आघाडी इत्यादी विविध पक्ष व संघटनांच्या वतीने राष्ट्रपूरुषांसह संताबद्दल बदनामीकारक बेताल वक्तव्य करुन सामाजिक वातावरण दूषित करणा-या मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडेच्या निषेधार्थ कड्यात डाॅ. आंबेडकर चौक ते स्मशानभूमी अशी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढुन भिडेच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन छेडून जाहीर निषेध केला. तसेच स्वातंत्र्य दिनाबद्दल शंका उपस्थित करुन राष्ट्रध्वजाचा अवमान करणा-या भिडेवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन त्यांच्या सर्वच कार्यक्रमावर शासनाने बंदी आणावी. अशी जोरदार मागणी आंदोलकांकडून करण्यात आली. 

याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते तान्हाजी जंजीरे, शिवाजी सुरवसे, प्रा. राम बोडखे, डाॅ. शिवाजी शेंडगे, रविंद्र ढोबळे, डाॅ. महेश नाथ, बाळासाहेब मिसाळ, राजाभाऊ शेळके, डाॅ. नदीम शेख, परमेश्वर घोडके, बबलू आखाडे, पोपट गर्जे, दीपक गरूड, बालू पोकळे, सुनिल जाधव, सचिन गोंदकर, राहूल जाधव, स्वप्निल पोटे, काकासाहेब कर्डीले, आदींसह विविध पक्ष, संघटनांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर आंदोलन शांततेत पार पडावे, म्हणून पोलिस निरिक्षक संतोष खेतमाळस यांनी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला होता.

देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा !

मुलभूत प्रश्नांवरुन जनतेचे लक्ष विचलित करण्याच्या हेतूने विकृत मनोवृत्तीचे मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे महात्मा फुले, महात्मा गांधी, पंडीत नेहरू, संत साईबाबा आदी महापूरुषांबद्दल बेताल वक्तव्य करुन सामाजिक वातावरण दूषित करीत असून, सामाजिक सलोखा धोक्यात आणणा-या भिडेवर शासनाने देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा असे इंजि तान्हाजी जंजीरे,अध्यक्ष मराठा सेवा संघ,आष्टी यांनी सांगितले. 


Post a Comment

0 Comments