पाथर्डी - स्वाभिमानी
शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्या आदेशानुसार शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यातील
पदाधिकाऱ्यांच्या निवडी नुकत्याच जाहीर करण्यात आल्या असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे
दक्षिण जिल्हाध्यक्ष सुनील लोंढे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत शेवगाव तालुका
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या अध्यक्षपदी मेजर अशोक भोसले यांची तर पाथर्डी तालुकाध्यक्षपदी
बाळासाहेब गर्जे यांची निवड सर्वानुमते करण्यात आली.
या निवडी प्रसंगी जिल्हाध्यक्ष
रावसाहेब लवांडे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब फटांगडे जिल्हा उपाध्यक्ष मच्छिंद्र आरले,दत्तात्रय
फुंदे,माजी तालुकाध्यक्ष प्रशांत भराट,संतोष गायकवाड,दादासाहेब पाचरणे,नानासाहेब काकडे,हनुमान
उगले,पाथर्डी तालुक्यातील रमेश कचरे पाटील,रामभाऊ भिसे, अंकुश ढाकणे,वामन तांदळे,लक्ष्मण
गर्जे,वैजनाथ गर्जे,अमोल ढमाळ,अशोक केदार,राजू बांगर तसेच दोन्ही तालुक्यातील प्रमुख
पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
0 Comments