सदर बाबत दि.
२९/०८/२०१६ रोजी पाथर्डी पो.स्टे.,
जि. अहमदनगर गु.र.नं.३३४७/२०१६
भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ चे कलम ७,
१३ (१)(ड) सह १३ (२) प्रमाणे गुन्हा
दाखल करण्यात आला होता. सदर सापळा कारवाई विष्णु आव्हाड, तत्कालीन पोलीस
निरीक्षक, लाचलुचपत
प्रतिबंधक विभाग, अहमदनगर
यांनी केली होती व त्यांनी गुन्हयाचा तपास पूर्ण करुन मा. विशेष न्यायालय, अहमदनगर येथे नमुद
आरोपीविरुध्द दि. ०२/१२/२०१६ रोजी दोषारोपपत्र दाखल केले होते.
सदर खटल्याची सुनावणी मा. श्रीमती एम. ए. बरालिया, जिल्हा न्यायालय - २ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, अहमदनगर यांचे समोर होऊन पोलीसांनी केलेला चांगला तपास व महत्वाच्या साक्षीच्या आधारे मा. न्यायालयाने आरोपी लोकसेविका शुभांगी प्रल्हाद ससाणे यांना आज दि. ०३/०८/२०२३ रोजी भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ चे कलम ७ व १३(१) (ड) प्रमाणे ४ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व १०,००० /- रुपये दंड तसेच दंड न भरल्यास ३ महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे.सदर खटल्याचे सरकार पक्षातर्फे अॅड. श्री. एम. व्ही. दिवाणे, सहायक सरकारी अभियोक्ता, अहमदनगर यांनी काम पाहिले असून त्यांना मपोना. संध्या म्हस्के, नेमणुक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अहमदनगर यांनी मदत केली आहे.
0 Comments