कडा / वार्ताहर - येथील शतकपुर्तीकडे यशस्वी वाटचाल करणा-या कडा येथील श्री. अमोलक जैन शिक्षण संस्थेच्या गांधी महाविद्यालयात शुक्रवार दि.१८ व १९ आॅगष्ट रोजी नॅक कमिटी मुल्यांकन करण्यासाठी भेट देणार असून, त्याकरिता महाविद्यालयाची तयारी झाल्याची माहिती प्राचार्य डाॅ. नंदकुमार राठी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आष्टी तालुक्यातील कडा येथील शतकपुर्तीकडे यशस्वी वाटचाल करीत असलेल्या श्री. अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळाच्या गांधी महाविद्यालयाने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करुन उत्तुंग भरारी घेतली. या गांधी महाविद्यालयाचे मुल्यांकन करण्यासाठी शुक्रवार दि.१८ व १९ आॅगष्ट रोजी नॅक कमिटी दोन दिवस भेट देऊन, मागील पाच वर्षात या गांधी महाविद्यालयाने विविध विभागांतर्गत शैक्षणिक, सामाजिक उपक्रमाबरोबर मुक्त विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना, अमोलक देवराई, क्रिडा विभाग, ग्रंथालय, प्रयोगशाळा, भाषा विभागासह इतर बाबींची नॅक कमिटी तपासणी करणार आहे. या महाविद्यालयाने विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परिक्षेची तयारी करण्यासाठी अत्याधुनिक दालनाची निर्मिती केली असून, कडा परिसरातील दहा गावातील शेतक-यांसाठी माती परिक्षण, गांडूळ खत, उपयुक्ततेबद्दल मार्गदर्शन केले. तर वनस्पती शास्त्र विभागांतर्गत महाविद्यालयाच्या परिसरात १००८ वृक्ष व १७० प्रकारच्या औषधी वनस्पतींची लागवड करुन आकर्षक उद्यान तयार केले आहे. तसेच शारीरिक शिक्षण विभागाकडून सहा स्टेशन जिम, टेबल स्टेनिस, कॅरम, बुध्दीबळ, चारशे मिटर रनिंग ट्रॅक, बास्केट बाॅल प्रांगण तसेच माजी विद्यार्थ्यी व महाविद्यालयाचा समन्वय राहण्यासाठी "अॅप" तयार केले आहे. शुक्रवार व शनिवार या दोन दिवस नॅक कमिटी भेट देणार असून, महाविद्यालयाचे आजी, माजी विद्यार्थ्यांसह पालकांनी या दिवशी उपस्थित राहण्याचे आवाहन प्राचार्य डाॅ नंदकुमार राठी, उपप्राचार्य जमो भंडारी यांनी केले आहे.
0 Comments