बोगस खरेदीखते नोंदवणाऱ्या निबंधकावर गुन्हे नोंदवा – जिरेसाळ


पाथर्डी - शासकीय मार्गदर्शक नियमांचा भंग करून स्वतःचे आर्थिक लाभापोटी बोगस दस्त तयार करून तो नोंद करून घेतलेल्या दुय्यम निबंधक,पाथर्डी यांनी संगनमताने शासनाची व मूळ प्लॉट धारकाची फसवणूक केलेली असल्यामुळे त्यांचेवर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी पाथर्डी तालुका मनसेच्या वतीने तहसीलदार यांचेकडे करण्यात आली आहे.

पाथर्डी शहर व तालुक्यातील मोकळी शेत जमीन व बिगरशेती प्लॉट हेरून ती मालमत्ता ज्याचे नावे आहे त्या व्यक्तीचे बोगस आधारकार्ड बनवून संबधित मालमत्तेची लाखो रुपयांना विक्री करण्याचें रॅकेट नुकतेच उघडकीस आले असून ज्यांचेवर मालमत्तेचा मूळ मालक खातरजमा करून त्याने सादर केलेलीं स्वतःच्या ओळखपत्राची कागदपत्रे बोगस आहेत की नाही हे तपासून मग ते दस्त नोंदणी करण्यासाठी दाखल करून घेण्याची जबाबदारी आहे त्या दुय्यम निबंधक पाथर्डी यांचेवर दस्त नोंदणी करते समयी शासनाच्या मार्गदर्शक नियमांचा भंग करून स्वतःचे आर्थिक लाभापोटी आपल्या कर्तव्यात कसूर करून शासनाची व संबधित मालमत्ता धारकांची फसवणुक केलेली असल्यामुळे त्यांचेवर फसवणुकीसह,कर्तव्यात कसूर केले प्रकरणी फौजदारी कारवाई करण्यात यावी अशी मागणी पाथर्डी तालुका मनसे च्या वतीने तालुकाध्यक्ष संतोष जिरेसाळ व परिवहन सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश पालवे यांनी तहसीलदार श्याम वाडकर यांचेकडे केली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना जिरेसाळ यांनी सांगीतले की,पाथर्डी शहर हद्दीतील बसवेश्वर नगर स्थित सर्व्हे नंबर २८/६ मधील फ्लॅट क्र.८ हा अनिल राजनाथसिंग यादव व सुनील राजनाथसिंग यादव यांनी दि.२०/०१/२०१८ रोजी मा.दुय्यम निबंधक पाथर्डी यांचे समोर रजिस्टर दस्त करत खरेदी केलेला असून तशी नोंद सर्व महसुल दफ्तरी करण्यात आलेली आहे.सदर दोनही यादव बंधू पाथर्डी शहरात मजुरीचा व्यवसाय करत असून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत व पुढील जिवनात राहण्याची सोय असावी या दृष्टीने त्यांनी सदर प्लॉट खरेदी केलेला आहे,मात्र असे असताना दुय्यम निबंधक औरंगाबाद क्र.६ यांनी सदर पाथर्डी येथील प्लॉट क्र ८ चे स्वतःचे नावे कुलमुखत्यार पत्र करण्यासाठीं आलेल्या बोगस व्यक्तीचे हक्कात सदर यादव बंधूचे नावाचे बोगस आधारकार्ड व इतर कागदपत्रांची शासनाचे मार्गदर्शक नियमांनुसार कुठल्याही प्रकारची शहानिशा न करता,स्वतः चे आर्थिक लाभापोटी दि.१६/०६/२०२३ रोजी दस्ताद्वारे सदर यादव बंधूंच्या नावे असलेल्या प्लॉट क्र.८ चे कुलमुखत्यार पत्र दस्त नोंदणी करून दिले..

त्याच प्रमाणे दुय्यम निबंधक पाथर्डी यांनी त्यापुढे दि.२७/०६/२३ रोजी सदर प्लॉट चे बोगस खरेदी दस्त नोंदणी करत त्यामध्ये खरेदी देणार म्हणुन अनिल यादव व सुनील यादव यांचा उल्लेख असताना देखील त्यांचे अनुपस्थित त्यांचे खोट्या सह्या असलेला खरेदी दस्त खरेदी देणार म्हणुन सदर प्लॉट चे बोगस कुलमुखत्यार पत्र तयार करून घेतलेल्या व्यक्तीची लिहून देणार म्हणुन दस्त गोषवरा भाग २ मध्ये सही घेत या बोगस खरेदी दस्ताद्वारे तिसऱ्याच व्यक्तिच्या नावे नोंद करून दिला आहे.

याचप्रमाणे दुय्यम निबंधक,पाथर्डी यांनी दि.२७/०७/२३ रोजी बोगस रजिस्टर दस्त द्वारे पाथर्डी शहर हद्दीतील स.न.२८/६ मधील प्लॉट क्र.७ चे मूळ मालक अनिल अर्जुन गर्कल यांचा प्लॉट अशाच प्रकारे स्वत:च्या आर्थिक लाभापोटी,सदर प्लॉट चे मूळ मालक हजर नसताना त्यांचे अपरोक्ष त्यांचे ऐवजी बोगस व्यक्तीची लिहून देणार म्हणुन नोंद करत सदर प्लॉट तिसऱ्याच व्यक्तिच्या नावे खरेदी दस्त नोंदणी करून दिलेला आहे.

प्रत्येक दस्त नोंद करते समयी शासनाने दुय्यम निबंधक यांना मार्गदर्शक तत्वे आखुन दिलेली असून दस्त नोंदणी करण्यासाठी आलेल्या व्यक्तींची शासकीय नियमानुसार/आधार प्रमाणीकरण करून केल्याखेरीज दस्त नोंदणी करु नये असे स्पष्ट निर्देश असताना देखील वरील दुय्यम निबंधक यांनी स्वतःचे आर्थिक लाभापोटी शासनाची सर्व मार्गदर्शक तत्वे पायदळी तुडवत शासनाची व संबधित प्लॉटच्या खरे मालक असलेल्या मालमत्ता धारकांची घोर फसवणूक केलेली असून यामुळे वरील दोन्ही मालमत्ता धारकांसह तालुक्यातील इतरही मालमत्ताधारक पुरते हवालदिल झालेले असून पै पाई जमा करून,कष्टानं विकत घेतलेली शेतजमीन,प्लॉट हा आपल्याच नावावर आहे की परस्पर दुसऱ्याच्या नावावर झाला आहे अशी भीती तालुक्यातील मालमत्ता धारकांमध्ये निर्माण झाली आहे.

अशाप्रकारे दुय्यम निबंधक यांच्या भ्रष्ट व गलथान कारभारामुळे आपली स्वकष्टार्जित मालमत्ता डोळ्यादेखत दुसऱ्याच्या नावावर बघून एखाद्या तणावग्रस्त मालमत्ता धारकाने स्वतःच्या जीवाचे बरेवाईट करून घेतले तर त्याला जबाबदार कोण.? तहसिल कार्यालयात असलेले दुय्यम निबंधक याबाबत "आम्हीं शासनाला महसूल गोळा करून देतोत" या सदराखाली स्वतःची तुंबडी भरण्यासाठी असे भ्रष्ट व गैरप्रकार करत असतील तर त्यांनाही कायद्याचा चाप बसने आवश्यकच आहे.

त्यासाठी अश्या प्रकारे स्वतःचे आर्थिक लाभापोटी शासनाची व सर्वसामान्य मालमत्ता धारकांची फसवणुक करणाऱ्या दुय्यम निबंधक औरंगाबाद क्र.६ व दुय्यम निबंधक, पाथर्डी यांचेवर भा.द.वि.क. ४२०,१२० ब व ३४ अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा व या दोन्ही दुय्यम निबंधक यांनी अशा प्रकारे या व्यतिरिक्त केलेल्या बोगस रजिस्टर दस्तांची पोलिस तपास करून चौकशी करण्यात यावी व त्याआधारे दोषींवर पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी अन्यथा पीडित मालमत्ता धारकांच्या वतीने या विषयावर मा.जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन करण्याचा इशाराही मनसेच्या वतीने देण्यात आलेला आहे.

 


Post a Comment

0 Comments