रखडलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या प्रश्नावर काहींनी विनाकारण आंदोलने केली ! – खा.सुजय विखे

तिसगाव - अनेक वर्षापासून जिव्हाळ्याचा असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या प्रश्ना बाबत काहींनी विनाकारण आंदोलन केली,मात्र या रस्त्यासाठी करावयाचा पाठपुरावा तसेच घ्यावयाच्या मंजुरी तसेच लागणारा निधी हे आणण्याची धमक केवळ आमच्याकडेच असून आ. मोनिका राजळे, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी ज्या पद्धतीने याचा पाठपुरावा केला आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून आपण निधी मंजूर करून आणला त्या नंतरच हा एवढा चांगला महामार्ग बनला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. श्रेयासाठी अनेकजण वाट पाहूनच असतात मात्र जनतेस सर्व माहिती आहे असे खा.विखे यांनी सांगताना ये पब्लिक हैं ये सब जानती है हा डायलॉग विखे यांनी ऐकवला. 

या बरोबरच या परिसरातील वांबोरी येथील चारीचा ही प्रश्न अशाच पद्धतीने आम्ही सोडविला आहे. आमच्याकडे काम करून घेण्याची धमक आहे आणि आमचा हेतू शुद्ध आहे त्यामुळे आमची कामे हे पटापट होतात,या भागातील शेतकऱ्यांच्या भूसंपादनाच्या मावेजा विषयी आपण सातत्याने पाठपुरावा करत असून लवकरच त्यांच्या खात्यावर मावेजा जमा होईल असे विखे यांनी सांगितले. आम्ही या भागात केवळ राजकारण केलं नाही तर या परिसराचा सर्वांगीण विकास साधला आहे. आपण कधी ही राजकीय परिस्थितीचा विचार केला नाही केवळ काम करत राहिलो असे सांगून निवडणुकीची चिंता आपण कधीच केला नाही.विरोधक हे केवळ विरोधासाठी सातत्याने आडकाठी आणात असतात मात्र ते सर्व पार करून आम्ही कामे केलीत. 

जनतेने आजवर आमच्यावर केवळ विश्वास ठेवला आणि आम्ही या विश्वासास पात्र ठरण्याचे काम करतोय. येणाऱ्या निवडणुकीत पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच करावयाचे असून यासाठी आपण कामाला लागले पाहिजे असे आवाहन केले. यावेळी व्यासपीठावर जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, आ.मोनिका राजळे, अभय आव्हाड, दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीपराव भालसिंग यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. या मेळाव्या दरम्यान काशिनाथ लवांडे यांच्यासह समस्त कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांचे पक्षात स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी पांडुरंग फसले महाराज, रामकृष्ण काकडे,माणिकराव खेडकर, पुरुषोत्तम आठरे, कुशल भापसे, धनंजय दढे, सुभाष बर्डे,चारूदत्त वाघ, एकनाथ आटकर, सुनील परदेशी,जिजाबापू लोंढे तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments