अतिक्रमण हटाव मोहिमेला हिरवा कंदील ! अतिक्रमण धारकाचा स्थगिती अर्ज फेटाळला !


पाथर्डी - शहरातील नगरपालिका इमारती भोवती तसेच रस्त्याला अडथळा ठरणारे अतिक्रमित बांधकाम टपरी हटवण्याच्या कार्यवाहीला स्थगिती देण्यास न्यायालयाने नकार दिला असून संबंधित टपरी धारक गोपाल हरकुट यांचा अंतरिम मनाई अर्ज न्यायालयाने फेटाळला असल्याने पालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा मार्ग मोकळा झाला आहे.

शहरातील नूतन पालिका इमारती समोर विरसावरकर मैदानाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या डाव्या बाजूला गोपाल मदन हरकुट यांची टपरी असून सदरील जागा हरकुट यांनी सदरील जागेचे पूर्वीचे धारक गटांनी यांचेकडून यापूर्वी अनेक वर्षापूर्वी ताब्यात घेतली असून ते पालिकेचा नियमित कर भरत असल्याचे म्हटले आहे. मात्र पाथर्डी पालिकेने सदरील जागा ही पालिकेच्या मालकीची असून सदरील जागेवर गोपाल हरकुट यांचे अतिक्रमण असून ते हटवण्याबाबत संबंधित टपरीधारकांला नोटीसा दिल्या होत्या त्याच अनुषंगाने टपरी धारकांनी पालिकेच्या अतिक्रमण हटाव कार्यवाहीस स्थगिती मिळण्यासाठी वादी गोपाल मदनलाल हरकुट यांनी पाथर्डी येथील दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला होता.

याबाबत अंतरिम स्थगिती अर्जावर न्यायालयात सुनावणी झाली असता वादी गोपाल हरकुट यांच्याकडे सदरील जागेचा ताबा कोणत्या मार्गाने आला व त्याबाबत त्यांचा सदरील जागेवर कोणतेही हक्क व अधिकार निर्माण होत नसल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले असून प्रस्तुत स्थगिती अर्जाच्या सुनावणी दरम्यान पालिकेच्या जागेवरील धारक केवळ पालिकेला कर देतो किंवा तो बऱ्याच कालावधीसाठी सदरील जागेवर ताबा करतो हे कारण अतिक्रमण हटवण्यास स्थगिती देण्यासाठी पुरेसे नसल्याचे निरीक्षण दिवाणी न्यायाधीश श्रीमती अश्विनी बिराजदार यांनी नोंदवले असून वादी हरकुट यांचा स्थगिती अर्ज फेटाळला आहे. पाथर्डी पालिकेच्या वतीने वकील श्री बाळकृष्ण शिरसाट यांनी बाजू मांडली


Post a Comment

0 Comments