पाथर्डी- पत्रकार संरक्षण कायद्याची
कठोर अंमलबजावणी करावी.पत्रकारांवरील हल्ल्याचे खटले जलदगती न्यायालयामार्फत चालवावेत.आमदार किशोर पाटील
यांच्यावर कारवाई करावी यामागणीसाठी पाथर्डीचे
सहाय्यक पोलिस निरीक्षक रामेश्वर कांयदे यांना मराठी पत्रकार परीषदेच्या वतीने शहरातील पत्रकारांनी निवेदन दिले.
यावेळी पत्रकार संरक्षण कायद्याच्या अध्यादेशाची होळी
करण्यात आली. महाराष्ट्रात ८ नोव्हेंबर २०१९ पासून पत्रकार संरक्षण कायदा लागू झाला आहे. हा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे.याचा आम्हाला नक्कीच अभिमान
आहे. महाराष्ट्राचा हा कायदा पुरेसा सक्षम आणि चांगला असला तरी त्याची
अंमलबजावणी होत नसल्याने तो आता कुचकामी ठरला
आहे. राज्यात गेल्या चार वर्षात जवळपास २०० पत्रकारांवर हल्ले
झाले किंवा त्यांना, धमक्या,
शिविगाळ केली गेली . मात्र केवळ ३७ प्रकरणातच पत्रकार संरक्षण कायदा लागू केल्याने आणि त्यातील एकाही प्रकरणात आरोपीला शिक्षा न झाल्याने या कायद्याची उपयुक्तता संपली आहे.
कायद्याची भितीच समाजकंटकांच्या मनात उरली नाही. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा चिंता वाटावी एवढ्या मोठ्या संख्येनं पत्रकारांवरील हल्ले वाढले आहेत.. अलिकडेच पाचोरा येथील एका पत्रकारास आमदार किशोर पाटील यांनी अगोदर शिविगाळ केली.दुस-या दिवशी आपल्या गुंडाकरवी त्यांच्यावर हल्ला चढविला.हे चित्र उभ्या
महाराष्ट्राने पाहिले, ऐकले आहे. असे असले तरी मारहाण करणा-या गुंडांवर किंवा
शिविगाळ आणि धमक्या देणार्या आमदार
किशोर पाटील यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्याखाली
गुन्हा दाखल झालेला नाही. यावेळी मराठी पत्रकार परीषदेचे तालुकाध्यक्ष राजेंद्र सावंत, ज्येष्ठ मार्गदर्शक अविनाश मंत्री,
उमेश मोरगावकर, अँड. हरीहर गर्जे, अमोल
कांकरीया, राजु भंडारी, अनिल खाटेर, अभिजीत
भंडारी, नितीन गटाणी,संदीप
शेवाळे, सचिन दिनकर यांच्यासह तालुक्यातील पत्रकार उपस्थीत होते.
0 Comments