गतिमान सरकारने एक वर्षात शेतकऱ्यांना काय दिले ? -आमदार प्राजक्त तनपुरे

मिरी (प्रति)- शेतकऱ्यांच्या विजेच्या प्रश्नांसंदर्भात आघाडी सरकारने एक योजना आणली होती, ती योजना या गतिमान सरकारने बंद केली, ती योजनाच बंद झाल्याचे देखील मंत्र्यांना माहित नव्हते,मग हे सरकार कोण चालवित आहे? असा सवाल आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केला. 

                पाथर्डी तालुक्यातील मिरी जवळील आडगाव येथे विविध विकास कामांचे उद्घाटन आमदार तनपुरे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आडगाव विविध कार्यकारी सोसायटीने चेअरमन संजय चांडे होते. आपल्या प्रमुख भाषणात पुढे बोलताना आमदार म्हणाले, गतिमान सरकार जाहिरातीवर कोट्यावधी रुपये उधळीत आहे मात्र या गतिमान सरकारला एक वर्ष पुर्ण होवुन गेले तरी जे शेतकरी वेळेवर कर्ज फेड करतात त्यांना प्रोत्साहनपर पन्नास हजार रुपये देता येईनात, एक वर्षात अतिवृष्टीचे पैसे देता येईनात, शेतकऱ्यांना दिवसा विज देता येईना,नविन सबस्टेशन, डिपी देण्याची एक योजना आघाडी सरकारने सुरु केली होती, या योजनेत दोन हजार कोटी रुपये शिल्लक असताना ही योजनाच या सरकारने बंद केली. अशा अनेक योजनांची माहिती मंत्र्यांना देता येईना, अधिकारी माहिती देतात, हे गतिमान सरकार कोण चालवित आहे? असा सवालही आमदार तनपुरेंनी यावेळी केला. 

        या कार्यक्रमास पंचायत समिती सदस्य राहुल गवळी,भागिनाथ गवळी, जालिंदर वामन, एकनाथ झाडे, अंबादास डमाळे,उध्दव दुसंग, सुनिल कराळे, आबासाहेब अकोलकर, सरपंच जगन्नाथ लोंढे, सुरेश बर्फेसह अनेक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ह.भ.प.बाळासाहेब गडकर यांनी केले.

            गतिमान सरकारची जाहिरात मि एका शाळेवर पाहिली, त्यात दोन उपमुख्यमंत्र्यांचे फोटो, आता पुढच्या वर्षी आणखी एखाद्या उपमुख्यमंत्र्याचा फोटो लावण्याची वेळ या सरकारवर येईल असे आमदार तनपुरे यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments