कड्यात वीस दिवसांपासून रोहित्र नादुरुस्त, अनेक गावे अंधारात

 


कडा / वार्ताहर - येथील वीज महावितरण कंपनीच्या ३३ केव्ही उपकेंद्रातील पाच (एमव्हीए) पाॅवर रोहित्रात मागील वीस ते पंचवीस दिवसांपासून बिघाड होऊन नादुरुस्त झाल्यामुळे या उपकेंद्रावर अवलंबून असणा-या कड्यासह पाच ते सहा गावांना अंधाराचा सामना करण्याची वेळ आली असून, वीजेअभावी शेतक-यांसह व्यावसायिक मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहेत. त्यामुळे महावितरणने नादुरुस्त रोहित्राची तात्काळ दुरुस्ती करावी. नसता लोकशाही मार्गाने ग्रामस्थांसह रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादीचे युवानेते सुनिल नाथ यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिला आहे.

आष्टी तालुक्यात सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या कडा येथील महावितरण कंपनीच्या ३३ केव्ही वीज उपकेंद्रातील पाच (एमव्हीए) पाॅवर रोहित्रात मागील वीस ते पंचवीस दिवसांपासून बिघाड झाला असतानाही वीज महावितरणकडून या संदर्भात अद्याप कसलीच दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे या ३३ केव्ही वीज उपकेंद्रांतर्गत असलेल्या कड्यासह दोन शेरी, खाकाळवाडी, केरुळ, डोंगरगण, देवीनिमगाव, मोरेवाडी, शेलारवाडी ही गावे मागील अनेक दिवसांपासून अंधाराचा सामना करीत आहेत. याठिकाणी रोहित्रात बिघाड झाल्यामुळे वीजेचा प्रश्न गंभीर बनला असून शेतक-यांसह लहान- मोठे व्यावसायिक मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहेत. वीजेअभावी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न डोकेदुखी झाला असून, अगोदर पावसाने ताण दिल्याने शेतकरी हवालदिल झाला असतानाच, विहिरीत पाणी असूनही वीजेअभावी शेतातील पिकांनी माना टाकल्या आहेत. त्यामुळे वीज महावितरणने नादुरुस्त रोहित्राची महावितरणने तात्काळ दुरुस्ती करुन वीज पुरवठा सुरळीत करावा. अन्यथा  लोकशाही मार्गाने ग्रामस्थांसह रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादीचे युवानेते सुनिल नाथ यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिला आहे.

-----------%%-------

मागील वीस ते पंचवीस दिवसांपासून कडा ३३ केव्ही उपकेंद्रातील रोहित्रात बिघाड झाल्याने परिसरातील शेतकरी व व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे नवीन रोहित्र बसवून त्वरित वीज पुरवठा सुरळीत करावा. अन्यथा ग्रामस्थांसह तीव्र आंदोलन करावे लागेल असे  सुनिल नाथ, युवानेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी सांगितले. 

---------%%%%------ 

कडा येथील ३३ केव्ही वीज उपकेंद्रातील नादुरुस्त रोहित्रा संदर्भात वरिष्ठांना कळविण्यात आले असून, नवीन रोहित्र आले की, बसवून लवकरच वीज पुरवठा सुरळीत करण्यात येईल. असे  एस. बी. देशमुख उपकार्यकारी अभियंता, वीज महावितरण, आष्टी यांनी सांगितले. 

Post a Comment

0 Comments