घेणाऱ्याने घेत जावे
घेता घेता घेणाऱ्याने
देणाऱ्याचे हात घ्यावेत.....
या विंदा करंदीकरांच्या कवितेच्या ओळी आठवल्या की, डोळ्यासमोर सर्वात अगोदर वृक्ष उभे राहतात, जणू काही या ओळी झाडांसाठीच लिहिल्या गेल्या आहेत असे वाटते."देणाऱ्याने देत जावे " या ओळीप्रमाणे झाडे माणसांना खूप काही देतात,भरभरून देण्याची वृत्ती ओतप्रोत झाडांमध्ये भरलेली आहे. आणि मानवाने या गोष्टीचा पुरेपूर फायदा घेतलाय."घेणाऱ्याने घेत जावे" या ओळीप्रमाणे मानवाची वृत्ती आहे ...परंतु झाडांना मानवकडून काहीच अपेक्षा नसते. वृक्षाकडे जी देण्याची वृत्ती आहे, मानवाने या वृत्तीचा पुरेपूर फायदा घेतलाय..... वृक्ष हे मानवाच्या जीवनाचा मूलभूत आधार आहेत.
या वृक्षांमुळे मानवाला विविध वस्तू प्राप्त होतात. झाडांपासून मिळणारी फुले,फळे, औषधी गुणधर्म असणाऱ्या वनस्पती, शुद्ध हवा हे तर ते देतातच पण याच बरोबर वृक्ष मानवाला आणि सर्व सजीवांना आपले जीवन जगण्यासाठी प्राणवायू प्रदान करतात. तसेच वृक्ष स्वतः सर्व सृष्टीला हानिकारक असलेल्या कार्बनडाय ऑक्साइडला अवशोषित करतात. त्याच प्रमाणे वृक्ष हे संपूर्ण पर्यावरणाचे संतुलन राखण्याचे काम करतात. किंवा जमिनीची धूप रोखण्यासाठी वृक्षांची मदत असो, याचा पुरेपूर फायदा मानवाने स्वतःला तर करूनच घेतलाच, पण याबरोबरच झाडे म्हणजे निसर्गाची देणगी हे मानव विसरत चाललाय, जणू ती स्वतःच्या मालकीची संपत्ती असल्याप्रमाणे झाडांवर मालकीहक्क गाजवू लागले. प्रचंड प्रमाणावर वृक्षतोड केली जाते.आणि त्या जागेचा वापर मानव स्वतःच्या फायद्यासाठी करू लागला पण यामध्ये मानव स्वतःमध्ये आणि निसर्गामध्ये असलेले अतूट नाते विसरत चालला आहे. निसर्ग आणि मानव हे दोघेही एकमेकांवर अवलंबून आहेत.
निसर्गातून मानवाला खूप काही मिळत. परंतु मानव या सर्वाचा दुरुपयोग करतो. ज्या पद्धतीने वृक्ष हे मानवाचे मित्र आहेत, त्याचप्रमाणे वृक्ष हे अनेक पक्ष्यांचे सुध्दा मित्र आहेत. त्या पक्ष्यांचे निवास स्थान झाडावर असते, अनेक वृक्षांवर पक्षी आपला घरटे बांधून राहतात.मानवाप्रमाणेच पक्ष्यांना जगण्यासाठी घराची आवश्यकता असते. म्हणून निसर्ग हेच पशु-पक्ष्यांचे घर असते. जंगले हे पक्ष्यांचे माहेरघर म्हटले जाते.पण हेच माहेर घर नष्ट होत चालले आहे, याकडे प्रत्येकाने कटाक्षाने लक्ष देणे आवश्यक आहे.
यावर्षी प्रत्येकाने एक निर्धार करूया...एक तरी झाड लावू या ... आणि ते जगवू या .... जेणे करून या पक्ष्यांचे माहेर घर आबादित राहील....(दुर्गा भगत - पलाटे)(Hsc D.ed,M.A(Eco,His)B.ed, D.S.M)
0 Comments