जन्मापासूनच माणूस अनेक नात्यांना सोबत घेऊन जन्माला येतो. काही नाती ही रक्ताने जोडली जातात. काही नाती ही आपुलकीने जोडली जातात. काही नाती स्वार्थासाठी जोडली जातात, तर काही नाती ही निस्वार्थ भावनेने जोडली जातात. ... प्रत्येक नात्याला आपलं एक नाव असतं, स्वतःच एक अस्तित्व असतं... त्या अनेक नात्यांपैकी एक नातं खळखळ करून वाहणाऱ्या झाऱ्यासारखं निर्मळ,नितळ.... सुसाट धावणाऱ्या वाऱ्यासारखं.... ससळणाऱ्या पानांसारखा ...... समुद्रातील लाटांप्रमाणे असतं ...... , भक्कम, प्रामाणिक, निस्वार्थ भावनेने जपलं जाणार एक नात .....अतूट नातं "मैत्रीचं" नात...
ना वयाच बंधन.... ना जागेच बंधन ... ना कोणता भेदभाव... श्रीमंत असो वा गरीब.... कनिष्ठ असो वा वरिष्ठ ...... सर्व नात्यांपेक्षा एक अनोखं नातं .... एका मनापासून दुसऱ्या मनापर्यंत पोहचलेल नातं ते असतं मैत्रीचं नातं .....विश्वासावर टिकलेल नातं... जिथे विचार जुळतात तिथे मैत्री जुळते. इतर सर्व नाती एका बाजूला आणि मैत्रीचे पवित्र नातं एका बाजूला. नाही कोणत्या गोष्टीचं घेणं असतं, नाही कोणत्या गोष्टीचं देणं असतं. फक्त एकमेकांच्या विचारांनी बंध जोडलेले असतात.. ... कधी दुर्दैवाने एखाद्या संकटात आपण सापडलेले असू तर सर्वात पहिले आपल्याला मैत्राची /मैत्रिणीची आठवण येते आणि नकळत मोबाईलच्या कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये असलेला नंबर डायल केला जातो...... मैत्रीत कोणत्याही प्रकारची भिंत नसते .... त्यात पारदर्शकता असते. __हास्य आणि अश्रू ची भाषा एकमेकांना समजते_ , मैत्री ती असते जी काही ही न बोलता मनातील भावना ओळखून घेते. डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूच्या मागचं दुःख, हसणाऱ्या चेहऱ्यामागे असणारा आनंद .... मनातील अस्थिरते मागच कारण .... सगळचं जे न बोलता ओळखते ती मैत्री असते....
मित्र/मैत्रीण हे एक असं व्यक्तीमत्व आहे जे प्रत्येकाच्याच जीवनात असतं. मैत्री प्रत्येकाच्या जगण्याला एक वेगळा अर्थ देते. मैत्रीत लाडाच, प्रेमाचं, क्षुल्लक गोष्टीवरून भांडणं हे होतच असतात ;पण त्याहूनही जास्त असतं ते ऎकमेकांवरच प्रेम आणि ऎकमेकांवरच द्दृढ विश्वास. कवी श्री. अनंत राऊत यांच्या कवितेच्या ओळी मैत्रीच्या नात्यावर प्रकाश टाकत जीवनातील मैत्रीचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याचे स्पष्ट करतात.
खरचं एक मित्र हा वणव्यामध्ये गारव्यासारखा असतो.. असा मित्र किंवा मैत्रीण सर्वांच्या आयुष्यात असावा...सर्व मित्र मैत्रीणींना मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा........!!!! ~_दुर्गा भगत (HSC D.ed, M.A. (His/Eco) B.Ed, D.S.M.)_
0 Comments