पाथर्डी - शहरातील फुलेनगर मधील लोकवस्ती मध्ये असलेल्या गोदामातून भर दिवसा विषारी साप,उंदीर, घुशी बाहेर येऊन आज बाजूच्या घरात प्रवेश करत असल्याने या परिसरातील नागरिक भयभीत झाले असून नागरिकांनी हे गोदाम इतरत्र हलवण्याची मागणी केली आहे.
फुले नगर परीसरातील खाजगी पेंड ,भुसा ,भुसार , मालाचे गोदाम आहे सदरील गोदाम हे भर रहिवासी वस्ती मध्ये आहे रोज मोठ्याट्रक व जड वाहनांची दळण वळण चालू असते विशेष म्हणजे दाहा फुटाच्या रोड गोदाम माला ची दळण वळण चालू असते पर्यायाने रस्ता पूर्ण पणे बंद होतो त्यामुळे रहिवासी ना मोठा त्रास सहन करावा लागत आहे , गोदाम मध्ये कुठल्याही प्रकारची दखल सदरील मालक घेत नाही अनेक वेळा रहिवासी यांनी त्रासाला कंटाळून नगर परिषद कडे धाव घेतली पण त्याच काही फरक सदरील गोदाम मालकाला पडला नाही नगरपालिका चे चेंबर , विधुत वीज मंडळा चा पोल गोदाम च्या दळणवळण करनाऱ्या वाहनाणी पाडला होता विधुत मोठी हानी त्यावेळेस टाळली
पाऊस काळाचे दिवस चालू आहेत त्यामुळे या ठिकानी साप, विंचू, विषारी जीवजंतू निघता अनके वेळा सर्प मित्राला बोलून हे साप पडकले जातात. या भागात अनेक वयोवृद्ध लोक लहान मुलांचा मोठ्या प्रमाणात वावर असतो अनेक वेळा अश्या प्रकारच्या या भागात दुर्घटना घडत आहे सदरील गोदाम ची परवानगी कधी व रहिवासी भागात कशी मिळाली या वर प्रश्नचिन्ह आहे सदरील गोदाम चे बांधकाम जुने असून त्याची पडझड होऊन मोठी दुर्घना होऊ शकते अनेकनदुर्गंधी वास या मधून येत असतो त्यामुळे स्थानिक रहिवासी यांनी सदरील गोदाम दुसऱ्या ठिकाणी हालावे या मागणी साठी नगरपालिकेत अर्ज दिला असून सदरील गोदाम मुळे स्थानिकांचे जीवन धोक्यात आले असून पालिका प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे असे माजी नगरसेवक प्रसाद आव्हाड यांनी सांगितले.
0 Comments