पाथर्डी - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जवखेडे दुमाला येथे 76 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा झाला ध्वजारोहण सरपंच सौ मंदाताई कसोटे यांच्या हस्ते करण्यात आले तसेच आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्ञानसागर क्लासेसच्या संचालिका सौ जयश्री अरुण नेहुल मॅडम होत्या , शाळेतील गोड चिमुकल्यांनी देशभक्तीपर गीत गायन व आपापली मनोगते व्यक्त केली, वर्षभरात विविध स्पर्धा परीक्षांमध्ये आलेल्या लाडक्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला .आपल्या गावातील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ज्ञानसागर कडून शालेय दप्तर ( सॅक ) सर्व विद्यार्थ्यांना देण्यात आले.
गावातील महिला बचत गटाकडून वही-पेन देवून चिमुकल्यांना खाऊ वाटप करण्यात आले.याप्रसंगी पाथर्डी तालुक्यात स्कॉलरशिप, नवोदय व सैनिक स्कूल या सारख्या विविध स्पर्धा परीक्षांमध्ये ज्ञानसागरचे विद्यार्थी दरवर्षी पात्र होतात त्याबद्दल सौ जयश्री अरुण नेहुल मॅडम यांचा शाळेचे शिक्षक व ग्रामस्थांच्या वतीने एक यथोचित सन्मान करण्यात आला याप्रसंगी कार्यक्रमाला गावच्या सरपंच मंदाताई कसोटे, उपसरपंच श्री भास्करभाऊ नेहूल , गावचे ग्रामसेवक,जेष्ठ नागरीक श्री काकडे गुरुजी,श्री बाजीराव नेहुल,शा.व्य.स.अध्यक्ष श्री जगदीश नेहुल, श्री संदीपराव
नेहुल,श्री उत्तम नेहुल,श्री बाबासाहेब नेहुल,श्री ताराचंद नेहुल,श्री उद्धवराव नेहूल,श्री महेश नेहुल,श्री आदिनाथ गिरी, अंगणवाडी सेविका,आशा सेविका व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक श्री तुपे सर यांनी केले व आभार सौ छाया तुपे मॅडम यांनी मांडले.
0 Comments