पाथर्डी - वाहतुकीचे
नियम पाळताना छोट्या छोट्या गोष्टीची का आपल्याला अडचण वाटते हे कळत नाही. वाहन
चालवताना नियम पाळल्यास अपघातमध्ये आपण जास्त सुरक्षित राहू, कायद्याने सर्व गोष्टी होत
नाही.नियमाचे पालन झाले पाहिजे ते चांगल्यासाठी आहे. असे प्रतिपादन महाराष्ट्र
राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सचिव अविनाश ढाकणे यांनी केले.
सुवर्णयुग तरुण मंडळाच्या गणेश स्थापना मिरवणूकीचा शुभारंभ ढाकणे
यांच्या हस्ते श्री चे पूजन करून करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी
प्रांत अधिकारी प्रसाद मते, उप
विभागीय पोलिस अधिकारी सुनिल पाटील, पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे,पोलिस उपनिरीक्षक सचिन लिंमकर, अशोक गर्जे,माजी
नगराध्यक्ष डॉ मृत्युंजय गर्जे ,पोलिस
विभागातील गुप्तवार्ताचे भगवान सानप,डॉ अभय भंडारी, योगेश
घोडके, परशुराम
पंडित,बंडू
दानापुरे,मुन्ना
खलिफा ,इजाज शेख
आदी उपस्थित होते.
झांज पथक,सावरा
ग्रुपचे गणेश वंदना, महिला
भजनी मंडळ,गणेश रथ
यांचा मिरवणुकीत सहभाग होता. वाहतुकीचे नियमांचे संदेश देणारे पत्रके सुवर्णयुग
मंडळाकडून ठीक ठिकाणी वितरित करण्यात आली. शिस्तबद्ध कार्यकर्ते एका गणवेशात
लक्षवेधी ठरली मागील चोवीस वर्षापासून सुवर्णयुगने अनेक सामाजिक कार्य गणेश
उत्सवासह वर्षभर तालुक्यात केले आहे.
सामाजिक विषय घेऊन सुवर्णयुग मंडळाने स्थापना !
मिरवणुकीत पथ नाट्यातून समाजातील ज्वलंत विषयावर प्रबोधनाचे काम केले.मंडळाचे कलाकार वैभव शेवाळे ,मुकुंद लोहिया,सोनल जोजारे, उमेश रासने,शाहरुख शेख, ऋषिकेश करवा,अक्रम आतार ,ओम जोशी यांनी वाहतुकीचे नियम समोर ठेऊन विंचू चावला... विंचू चावला हा भारुडतील ओळीच्या संवादाच्या माध्यमातुन सुरेख नाटिका पाथर्डीकारांचे मुख्य आकर्षण ठरले.सुवर्णयुग गणेश उत्सव २०२३ चे अध्यक्ष सोनल जोजारे यांनी मान्यवरांचे स्वागत केले.पाथर्डी शहरातील उपनगरात तर तालुक्यातील गावांमध्ये गण उत्साह पूर्ण वातावरणात सार्वजनिक गणेश मंडळांनी गणपतीची स्थापना केली.प्रास्ताविक अजय भंडारी, सूत्रसंचालन अभय गांधी तर आभार संजय उदमले यांनी मानले.वाहतुकीचे नियम यावर मंडळाने पथनाट्य करून फक्त जनजागृती केली नाही तर पाथर्डी पोलीस दलाला वाहतुकीसाठी लागणारे चांगल्या प्रतीचे लोखंडी बॅरिकेट्स ते मंडळाकडून प्रदान करण्यात आले.पाथर्डी शहरातील प्रथम मानाचा गणपती नवोदय ,जय भवानी,गणेश पेठ,कसबा,विश्वकर्मा,जय बजरंग व्यायाम शाळा, दगडमठ,दोस्ती तरूण मंडळ,सुवर्णयुग परिवार ट्रस्ट, श्रीराम मित्र मंडळ,जगदंब युवा प्रतिष्ठान ,अष्टवाडा,नेता सुभाष,आदर्श बाल गणेश,शिवसंग्राम संप्त चिरंजीव,गोल्डनग्रुप ,व्यापारी,न्यू दोस्ती,वेताळबाबा,सी आर पी बॉईज, एकलव्य, छत्रपती शिवाजी, मोर्य प्रतिष्ठान, संत वामनभाऊ अशा सार्वजनिक गणेश तरुण मंडळाच्या कार्यकत्यांनी वाजत गाजत गणेशाची सकाळ पासून ते रात्री दहा वाजेपर्यंत स्थापना केली. शहरात ४३ सार्वजनिक मंडळानी गणेशाची स्थापना केली.सकाळी पासुन रात्री पर्यंत स्थपना मिरवणुका संपन्न झाल्या.
0 Comments