आष्टीत काढली राज्य सरकारची अंत्ययात्रा !

कडा / वार्ताहर - केळसांगवी येथील सरपंच अजित घुले यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाला आरक्षण मिळावे. या मागणीसाठी गावक-यांनी राज्य सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून स्मशानभूमीत दहन करुन निषेध केला. जालन्यातील मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठींबा देत मंगळवारपासून महादेव मंदिरात उपोषण चालू केले आहे. 

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे गावकऱ्यांसह शांततेच्या मार्गानी उपोषण करीत असताना पोलिसांकडून अचानक करण्यात आलेल्या अमानुष लाठीहल्ल्यात महिला, वृद्ध, लहान मुलेही रक्तबंबाळ झाली. या घटनेच्या निषेधार्थ आष्टी तालुक्यातील केळसांगवी ग्रामस्थांनी मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवित मंगळवारपासून गावातील महादेव मंदिरात उपोषण चालू केले असून, राज्य सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून मराठा समाजाला आरक्षण देण्याची जोरदार मागणी केली. या प्रतीकात्मक अंतयात्रेत सरपंच अजिक घुले, ज्ञानेश्वर पडोळे, भाऊसाहेब घुले, विजय बोराडे, तुकाराम पडोळे, चंद्रकांत घुले, कैलास धस, नितीन घुले, विक्रम पडोळे, उद्धव पडोळे, जालिंदर पडोळे, हर्षद घुले, यांच्यासह महिला देखील मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

 

Post a Comment

0 Comments