डॉ ‌कैलास दौंड यांचा 'आई मी पुस्तक होईन ' बालकवितासंग्रह प्रकाशित

 

पाथर्डी - तालुक्यातील सोनोशी येथील प्रसिद्ध साहित्यिक डॉ ‌कैलास दौंड यांच्या ' आई मी पुस्तक होईन ' या बालकवितासंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. कादंबरीकार व‌ कवी म्हणून प्रसिद्ध असणारे डॉ ‌कैलास दौंड यांनी बालसाहित्यातही मौलिक योगदान दिलेले आहे. यापूर्वी त्यांची 'माझे गाणे आनंदाचे' व 'जाणिवांची फुले' ही बालसाहित्याची पुस्तके प्रकाशित आहेत. 

रविवारी २४ सप्टेंबर रोजी पाथर्डी येथील बाबुजी आव्हाड महाविद्यालयात 'मराठी साहित्यातील ऊसतोडणी कामगारांचे चित्रण' या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्र झाले. या चर्चासत्राच्या उद्घाटन सत्रात डॉ ‌कैलास दौंड यांच्या ' आई मी पुस्तक होईन ' या बालकवितासंग्रहाचे प्रकाशन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा.डॉ. संदीप सांगळे, तिफण त्रैमासिकाचे संपादक प्रा.डॉ.शिवाजी हुसे, प्राचार्य डॉ जी.पी.ढाकणे यांच्या हस्ते करण्यात आले.डॉ ‌.कैलास दौंड यांचा हा बालकवितासंग्रह औरंगाबाद येथील मिलिंद जगताप यांच्या सौरव प्रकाशनने सचित्र प्रकाशित केलेला आहे. 

यावेळी मंचावर पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष ॲड.सुरेशराव आव्हाड, श्री.गहिनीनाथ थोरे, श्री.दत्ताराम राठोड, प्रा.डॉ.दिलीप बिरुटे , ॲग्रोवनचे पत्रकार आणि शेती प्रश्नाचे अभ्यासक सुर्यकांत नेटके, मुक्त पत्रकार डॉ. सोमीनाथ घोळवे,प्रा.डॉ.सुभाष शेकडे , पत्रकार अविनाश मंत्री व राजेंद्र सावंत पाटील उपस्थित होते. डॉ ‌कैलास दौंड यांचा 'आई मी पुस्तक होईन ' हा बालकवितासंग्रह महाराष्ट्रातील बालवाचकांना नक्कीच आवडेल असा विश्वास वक्त्यांनी व्यक्त केला.यावेळी विविध भागातून आलेले प्राध्यापक व अभ्यासक आणि संशोधक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments