सैनिकांच्या सेवेसाठी त्रिदल सैनिक संघ कटीबद्ध !

 

पाथर्डी – भारतीय सैन्यदलातील मेडिकल (वैद्यकीय) कॉर्प्स मधून १९ वर्ष देशसेवा करून सेवानिवृत्त झालेल्या विजय पवार (आठरे  कवडगाव) यांचा त्रिदल सैनिक संघटनेच्या वतीने सन्मान करण्यात आला.

यावेळी त्रिदल संघाचे कॅप्टन दिनकर बडे,सार्जंट नारायण घुले, संतोष घुले,सीताराम गर्जे यांनी संघटनेला मार्गदर्शन केले.यावेळी विजय पवार साहेबांनी मनोगत करतांना देशसेवेनंतर समाज सेवेसाठी संघटनेत प्रवेश करून प्रतिबद्धता व्यक्त केली.त्रिदल संघ पाथर्डी तालुका अध्यक्ष गोवर्धन गर्जे यांनी पवार यांना शुभेच्छा देऊन त्यांना सहकार्याचे आश्वासन दिले.यावेळी दिनकर बडे, नारायण घुले, संतोष घुले, सीताराम गर्जे, अशोक पवार,  प्रकाश पवार,  शिवाजी खाडे, बाळासाहेब वांढेकर,  राजेंद्र जायभाय, रोहिदास गुंजाळ, सोमनाथ गोल्हार, अनिल शिरसाट, दिलीप आव्हाड,  सुदाम खेडकर, जालिंदर गोल्हार,  सुभाष गर्जे, बाळासाहेब कदम, आसाराम बनसोडे, राजू शिरसाट, कैलास खेडकर, शिवाजी डमाळे, शिवाजी खेडकर आदी त्रिदल संघाचे सभासद उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments