कल्याण-निर्मळ महामार्गावरील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाटाच्या पायथ्याशी रात्री उशिरा साडेबारा वाजण्याच्या दरम्यान आयशर ट्रक आणि दुधाच्या टॅन्करची समोरा-धडक होवुन झालेल्या भीषण अपघातात दोन्ही वाहनांचे चालक ठार झाले तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाले. पैठणवरुन विहामांडवा येथील आयशर कंपनीचा ट्रक (नं. एमएच-१६-सीसी-२३४७) शेंगादाण्याचे कट्टे घेवुन नगरकडे चालला होता, तर दुधाचा रिकामा टॅन्कर (नं. एमएच-१६-एवाय-९९७९) करंजीकडे येत असताना करंजी घाट संपल्यानंतर थोड्याच अंतरावर समोरा-समोर धडक होवुन झालेल्या भीषण अपघातात ट्रक चालक जावेद मन्सुर शेख, रा. विहामांडवा, पैठण, जि. औरंगाबाद, व टॅन्कर चालक शिवाजी नानासाहेब भवार रा. निवडुंगे, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर हे दोघे ठार झाले. ट्रकमधील अन्य दोघे जण गंभीर जखमी झाले. www.adhirajya.com मध्यरात्री अपघात झाल्यामुळे जखमींना वेळेत मदत मिळाली नाही. परंतु धडक झाल्यानंतर झालेल्या आवाजाने आजु-बाजुचे लोक जागे झाले. सध्या नवरात्र उत्सव चालु असल्याने येथील छत्रपती शिवाजी प्रतिष्ठानच्या तरुणांनी अपघातस्थळी धाव घेवुन अपघातग्रस्तांना मदत केली.
या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या नवरात्र उत्सव चालु असल्याने तालुक्यातील श्रीक्षेत्र मोहटादेवीच्या दर्शनासाठी पायी जाणाऱ्या भक्तांची रस्त्याने रात्रंदिवस मोठी गर्दी असल्याने वाहन चालकांना आपल्या वाहनांचा वेग कमि ठेवण्याच्या सुचना पोलिसांनी द्याव्यात अशी मागणीही नागरिक व प्रवाशातुन केली जात आहे. पाथर्डी पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असुन पोलिस पुढील तपास करीत आहेत.www.adhirajya.com
0 Comments