नगर-पाथर्डी महामार्गावर डिझेलच्या टॅन्करला आग,वाहतुक ठप्प !


करंजी -नगर-पाथर्डी महामार्गावरील मराठवाडी टोलनाक्याजवळ रात्री दिड वाजता डिझेल टॅन्करला रस्त्यावरच आग लागली, रस्त्यातच पेटलेल्या टॅन्करच्या आगीमुळे या मार्गावरील वाहतुक सुमारे दोन तास ठप्प होती, तर पायी मोहटादेवी दर्शनास जाणाऱ्या भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागला. 

      काल मध्यरात्री दिड वाजण्याच्या सुमारास मुंबईहुन बिडकडे २५ हजार लिटर डिझेल घेवुन जात असलेल्या टॅन्करने रस्त्यातच अचानक पेट घेतला. आगीचे मोठ-मोठ लोळ आकाशाला भिडले, या आगीमुळे विजेच्या तारा रस्त्यावरच गळुन पडल्या. रस्त्याने जात असलेल्या टॅन्करचे टायर फुटुन टॅन्करने पेट घेतला असल्याचे प्रत्यक्ष पहाणार्‍या नागरिकांनी सांगितले. स्थानिक गावकरी, अंभोरा, ता. आष्टी पोलिस स्टेशनचे कर्मचारी यांनी आष्टी येथील चार अग्निशामक दलाच्या गाड्या बोलवुन घेवुन तब्बल दोन तास आगीशी झुंज देवुन ही आग आटोक्यात आणली. दोन तास या महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. सध्या नवरात्र उत्सव चालु असल्याने या रस्त्यावरुन मोहटादेवीच्या दर्शनास पायी जाणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी असते, या टॅन्करला लागलेल्या आगीमुळे पायी जाणाऱ्या भक्ताचे व प्रवाशांचे मोठे हाल झाले, सुदैवाने या दुर्घटनेत जिवीतहानी झाली नाही.

                 नगर-पाथर्डी महामार्गावर रस्त्यातच टॅन्करला लागलेली आग विझविण्यासाठी येथील कचरेसर, अनिल मुरकुटे, मराठेसर, म्हातारदेव मराठे, माणिक मराठे, रमेश जाधव, महादेव मराठे, परशुराम मराठे, शुभम औटे, अशोक मराठे, अशोक कोतकर, मच्छिंद्र घोडके, गणेश हाडे, पप्पु मराठे, बन्सी मराठेसह अनेक स्थानिक कार्यकर्त्यानी व तरुणांनी या टॅन्करची आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न करुन प्रवाशांना व भाविकांना मदत केली.

Post a Comment

0 Comments