पाथर्डी
- शिरसाटवाडी
ग्रामपंचायतीस ग्रामसेवक द्या या मागणीसाठी सरपंच भावना अविनाश पालवे यांच्या
नेतृत्वाखाली पंचायत समिती कार्यालयात दोन तास ठिय्या आंदोलन करण्यात आले.
शिरसाटवाडी
ग्रामपंचायतला गेल्या दोन महिन्यापासून ग्रामसेवक पंचायत समिती प्रशासनाकडून दिला
जात नाही यासाठी सरपंच सौ.
भावना पालवे यांनी गटविकास अधिकाऱ्यांना पत्र
दिले होते यावेळी मनसे परिवहन सेनेचे जिल्हाध्यक्ष तथा ग्रा.प. सदस्य अविनाश पालवे
यांनी गटविकास अधिकारी यांना आक्रमकपणे ग्रामसेवक द्या, ग्रामसेवक
का टिकत नाही ? आपण ऑर्डर केली की गावात न येताच ग्रामसेवक रजेवर का जातात ? तुमचा ग्रामसेवकांवर वचक आहे की नाही ? गावातील
लोकांची कामे व विकास कामे कशी होणार ? असा प्रश्नांचा
भडीमार केला यावेळी यावर गटविकास अधिकारी जगदीश पालवे यांनी शिरसाटवाडी
ग्रामपंचायतला जे जे ग्रामसेवक हजर होणार नाहीत त्यांच्यावर निलंबनाची कार्यवाही
करणार असुन शिरसाटवाडी ग्रामपंचायत २६ डिसेंबर पर्यंत ग्रामसेवक देणार असे लेखी
आश्वासन दिले यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
यावेळी मनसेचे
संतोष जिरेसाळ, उपाध्यक्ष अशोक आंधळे, उपाध्यक्ष एकनाथ सानप, सुनील पाखरे,
शिवसेनेचे उपाध्यक्ष पोपटराव पालवे, अंकुश
चितळे, विभागाध्यक्ष नारायण शेकडे, सुधीर महाजन, शहाराम फुंदे, अंकुश
शिरसाट, संदीप शिरसाट, तुषार
शिरसाट, अंबादास शिरसाट, नवनाथ
शेकडे, विष्णू शेकडे, पांडुरंग
सानप, लहू शिरसाट, वैभव
ससाणे, मंगेश राठोड, शामसुंदर
शिरसाट, सिताराम कोंगे, संजय
घुले, अमोल गर्जे यांसह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.
0 Comments