उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या संकल्पनेतुन नमो चषक स्पर्धा - आमदार मोनिका राजळे

पाथर्डी ( प्रतिनिधी ) देशाचे भविष्य ज्यांच्या हातामध्ये द्यावयाचे आहे ती युवा पिढी सुसंस्कृत, निरोगी, सकारात्मक दृष्टीकोण व राष्ट्रावर प्रेम करणारी असावी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अपेक्षा आहे. सक्षम व भक्कम युवा पिढी घडविण्यासाठी मैदानी खेळ महत्वाचे असतात.शैक्षणिक संस्थाच्या माध्यमातुन हे कार्य अधिक प्रभावीपणे होऊ शकते.म्हणुनच खेळाडुंना प्रेरणा देण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतुन नमो चषक स्पर्धा २०२४ आयोजित करण्यात आल्याचे प्रतिपादन आमदार मोनिका राजळे यांनी केले.
      भारतीय जनता पार्टी शेवगाव-पाथर्डी तालुका आयोजित नमो चषक २०२४ अंतर्गत हॉलीबॉल स्पर्धेचा शुभारंभ राष्ट्रीय खेळाडू रमेश मोरगावकर, संतोष चोरडीया, अहमदनगरचे माजी महापौर बाबासाहेब वाकळे, अशोक गायकवाड यांच्या हस्ते श्री तिलोक जैन विद्यालयाच्या मैदानावर करण्यात आले त्यावेळी आ. राजळे बोलत होत्या. यावेळी अभय आव्हाड, सतीश गुगळे, डॉ.मृत्युंजय गर्जे, मंगल कोकाटे, मनिषा घुले, सिंधुताई साठे, सतिष शिरसाट, डॉ.सचिन गांधी, डॉ. अभय भंडारी, सुरेश कुचेरीया, अमोल गर्जे, राजुशेठ मुथ्था, रवि वायकर, महेश बोरुडे, जगदिश काळे, भगवान साठे, प्राचार्य अशोक दौंड, उमेश भालसिंग आदि प्रमुख उपस्थित होते.
 
१२ जानेवारी ते २४ जानेवारी २०२४ या कालावधीत संपन्न होणाऱ्या नमो २०२४ चषक स्पर्धेत क्रिक्रेट स्पर्ध साठी ६० संघ, हॉलीबॉल २० संघ सहभागी झाले आहेत तर सुमारे ३२ हजार खेळाडू विविध स्पर्धेत सहभाग नोंदविला आहेत तसेच तालुक्यातील खेळाडू, विद्यार्थी, विद्यार्थिनी, जेष्ठ नागरिक, महिला भगिनी, व्यापारी, नोकरदार, प्रशासकीय सेवक, ग्रामस्थ यांनी उस्फुर्त सहभाग नोंदविल्याने पाथर्डी शहरात सध्या उत्साहाचे वातावरण असुन शहराला क्रीडा नगरीचे स्वरूप आले आहे. या स्पर्धा पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील माध्यमिक विद्यालय व महाविद्यालयात स्पर्धा संपन्न होणार आहेत. रविवार दि. १४ जानेवारी रोजी बाबुजी आव्हाड महाविद्यालयाच्या मैदानावर सकाळी ९ वाजता फुटबॉल स्पर्धेचा शुभारंभ आमदार मोनिका राजळे, भाजपा जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे व लोकसभा विस्तारक मनोज कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे तरी खेळाडुसह व युवकांनी या स्पर्धेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे अवाहन संयोजकाच्या वतीने करण्यात आले आहे.कार्यक्रमाचे प्रास्तविक सतिष गुगळे यांनी, स्वागत युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष सचिन वायकर यांनी तर आभार भाजपा पाथर्डी शहराध्यक्ष अजय भंडारी यांनी मानले.

Post a Comment

0 Comments