पाथर्डी- खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत सतरा पैंकी सात जागा बिनविरोध झाल्या आहेत. सेवा सहकारी संस्था मतदार संघातील १० जागेसाठी ११ उमेदवार निवडणुक रिंगणात आहेत. सात जागा आमदार मोनिका राजळे यांच्या समर्थकांना मिळाल्या आहेत. विरोधी गटाने निवडणुकीवर बहीष्कार टाकला होता. पिपंळगाव टप्पा येथील बाळासाहेब शिरसाट यांनी उमेदवारी अर्ज माघारी घ्यावा यासाठी राजळे गटाने प्रयत्न केले. मात्र लोकशाही जिवंत ठेवायची असल्याने मी माघार घेणार नाही अशी भुमिका शिरसाट यांनी घेतल्याने अखेर १० जागेसाठी निवडणुक लागली आहे.
खरेदी विक्री
संघाच्या निवडणुकीसाठी ६० अर्ज दाखल झाले होते. त्यापैंकी
अनेकांनी अर्ज मागे घेतले. राजळे यांच्या समर्थकांनी अर्ज माघारी घेतले. तसेच अपक्ष अर्ज भरलेले वंसतराव
गर्जे, अरविंद
सोनटक्के, दिपक साळवे, सलीम शेख, अशोक चन्ने यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतले. आमदार मोनिका राजळे यांच्याशी चर्चा केल्यानंतर
पाचही जणांनी अर्ज मागे घेतले. सेवा सहकारी
संस्था मतदार संघात १० जागेसाठी ११ उमेदवार
रिंगणात आहेत. आमदार राजळे गटाकडुन कैलास देवढे (मोहोज देवढे), भगवान
आव्हाड(जांभळी), गंगाधर गर्जे (अकोला), राम पठाडे (मिडसांगवी),संदिप पठाडे(
वसुजळगाव), नवनाथ भवार (कळसपिंप्री) ,भिमराव पालवे(मोहटा),विठ्ठल मरकड(
निवडुंगा), आण्णासाहेब वांढेकर ( तिसगाव),मच्छिंद्र सावंत
(जोहारवाडी) यांना उमेदवारी मिळाली आहे. बाळु रावसाहेब
शिरसाट (पिंपळगाव टप्पा) हे अपक्ष उमेदवार रिंगणात
आहेत.
बिनविरोध निवडुण आलेले राजळे गटाचे उमेदवारी असे- सिंधुताई साठे, सुनिता काटे, अशोक मंत्री, बाबासाहेब चितळे, पोपट कराळे, पुरुषोत्तम इजारे, संतो, भागवत हे बिनविरोध संचालक झाले आहेत.
खरेदी विक्री
संघाचे निवडणुक निर्णय अधिकारी व येथील
सहाय्यक निबंधक यांना सोमवारी उमेदवारी अर्जाची माघारीची माहीती पत्रकारांनी माहीती मागीतली. त्यांनी माघार घेतलेले अर्ज
मी पाहीले नाहीत. आलेले अर्ज तसेच ठेवुन दिले
आहेत. उद्या यादी प्रसिद्ध करु असे सांगितले.
पत्रकारांना माहीती देताना अधिकारी असे उत्तरे देत आहेत. सामान्य माणसाला ते कसे बोलत असतील याचा अंदाज घेतला पाहीजे.
ज्या उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले त्यांचे
अर्ज
पहायला वेळ नसणा-या निवडणुक निर्णय अधिका-यांची नेमणुक कोणी केली याची माहीती घ्यावा लागेल.
पत्रकारांनी सहाय्यक निबंधकांचा निषेध केला आहे.
0 Comments