वाढते बालविवाह हि सामाजिक समस्या – प्रसाद मते

पाथर्डी- समाजात बालविवाहाचे प्रमाण वाढतेय ही सामाजिक समस्या दुर
करण्यासाठी प्रत्याकेन सामजिक बांधीलकीच्या भावनेतुन करावे. चांगल
करण्याची प्रेरणा समाजाकडुनच मिळत असते. ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका,
सीआरपीताई व सरपंच यांनी बालविवाह जागती मोहीमेत सहभाग नोंदवावा.
स्नेहालयाच्या उडाण प्रकल्पाच्या कार्याला आम्ही पाथर्डी-शेवगावमधे
चांगली मदत कर्तव्य भावनेतुन करु असे प्रतिपादन प्रांतअधिकारी प्रसाद मते
यांनी केले.

स्नेहालय युवानिर्माण आणि उडाण प्रकल्प आयोजित बालविवाह
जागृती सायकल यात्रेचे साव्गात शहरात आमदार मोनिकाताई राजळे, बाबुजी
आव्हाड महाविद्यालय, श्रीतिलोक जैन विद्यालय, पंचायत समिती पाथर्डी, उमेद
अभियान, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी पाथर्डी, जिल्हा विधी सेवा
प्राधीकरण, विविद रोटरी क्लब, अहमदनगर जिल्हा सायकल अशोशियन , विविध
सामाजिक संस्था यांच्या सहकार्याने ही पाचशे किलोमीटरची रँली आयोजित
करण्यात आली आहे. येथील पंचायत समितीच्या सभागृहामधे आयोजित जागृती
मोहीमेच्या कार्यक्रमात मते बोलत होते.

कार्यक्रमासाठी संजय नेहरकर, नितीन थाडे, बागेश्री जरांडेकर, विस्तार अधिकारी आण्णासाहेब गहीरे, उमेदच्या व्यवस्थापक मेघा घोळवे, बालविकास प्रकल्प अधिकारी अंजली आहेर, उमेदचे आण्णासाहाबे मोरे, नवनाथ मोरे, सचिन हाडुळेवैशाली गर्जे,राजेश केडाळे, प्रकाश शिरसाट, आकाश रामटेके, धनंजय आंधळे, प्रविण दहीफळे,
डॉ.श्रीधर देशमुख, नंदा पांडुळे, स्वाती ढवळे, सतिषशेठ गुगळे, सुरेश
कुचेरीया, प्राचार्य अशोक दौंड, राजुशेठ मुथ्था, डॉ.सचिन गांधी, डॉ.अभय
भंडारी, डॉ.सुभाष शेकडे, डॉ.बबन चौरे, डॉ.वैशाली आहेर, विकास
सुतार, प्रविण कदम, उषा खोल्लम, दिक्षा वावरे, सिमा जुनी यांच्यासह
सीआरपी ताई, कृषीसखी, पशुसखी, महीला व पुरुष विद्यार्थ्यी उपस्थीत होते.
राजेंद्र सावंत यांनी प्रस्ताविक केले. आभार प्रविण कदम यांनी मानले.
बाल विवाह रोखण्याची जबाबादीर नागरीक म्हणुन प्रत्येकाची आहे.
याबाबत समाजात जागृती होणे महत्वाचे आहे. सेन्हालयच्या उडाण प्रकल्पाने
हाती घेतलेले बालविवाह मुक्त अहमदनगर जिल्हा हे अभियान यशस्वी व्हावे
यासाठी अंगणवाडीताई, ग्रामसेवक, आशास्वंयसेविका, संरपच यांनी गावात काम
करावे. बालविवाहाचे दुष्परीनाम खुप आहेत. आरोग्य व मानसिक त्रास याचे
अतोनात नुकसान होते. जागृती मोहीमेसाठी माझ्या शुभेच्छा असल्याचे आमदार
मोनिकाताई राजळे बाबुजी आव्हाड येथे भेटीमधे सांगितले. स्नेहालयच्या
मुलींने सादर केलेल्या बालविवाह प्रतिबंधक पथनाट्याला रसिकांनी भरभरुन
दाद दिली. अतिशय मोजक्या शब्दामधे व कमी वेळेत नाटकरुपता सादर केलेले हे
नाट्य माणसाच्या काळजाचा ठाव घेत होते. बालविवाहातुन होणारे तोटे, दाखल
होणारे खटले आणि त्यातील गुंतागुंत याची समज देण्याचे काम युवतींनी केले.
याचे कौतुक आमदार मोनिकाताई राजळे, प्रांतअधिकारी प्रसाद मते,
श्रीतिलोकचे सचिव सतिषशेठ गुगळे यांनी केले. 


Post a Comment

0 Comments