कडा - श्री अमोलक जैन शिक्षण संस्थेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त गांधी महाविद्यालयात मंगळवार दि. २३ व २४ जानेवारीला अमोलक सभागृहात हवामानातील बदल आणि आत्मनिर्भर भारतापुढील आव्हाने या विषयावरील दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य व या परिषदेचे संयोजक डॉ. नंदकुमार राठी पत्रकार परिषदेत यांनी दिली.
आष्टी तालुक्यातील कडा येथील गांधी महाविद्यालयात मंगळवार दि २३ रोजी सकाळी १०:३० वाजता स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. पंडित विद्यासागर यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन होणार आहे. यावेळी त्रिभुवन विद्यापीठ काठमांडू, नेपाळचे अमेरिकेची फुल ब्राईट शिष्यवृत्ती प्राप्त प्रा. राधेशाम प्रधान, छञपती संभाजीनगरचे उच्च शिक्षण विभाग सहसंचालक डॉ. सुरेंद्र ठाकूर एस.जी.एम. विदयापीठ छत्रपती संभाजीनगरचे मानद प्राध्यापक, डॉ. के. एम. जाधव, टीकाराम जगन्नाथ महाविद्यालय खडकी पुण्याचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. व्यंकटेश लांब, डॉ. सय्यद अझरुद्दीन (वाणिज्य विभाग प्रमुख, नगरचे हवामान तज्ञ डॉ. बी. एन. शिंदे, इला फाउंडेशन पुण्याच्या संचालिका डॉ. सुरुची पांडे, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे शाखा व्यवस्थापक धीरज सूर्यवंशी, अमोलक संस्थेचे अध्यक्ष योगेश भंडारी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या परिषदेत संस्थेचे कार्याध्यक्ष कांतीलाल चाणोदिया, विश्वस्त अध्यक्ष श्री गोकुळदास मेहेर, उपाध्यक्ष अनिल झाडमुध्या, बिपीन भंडारी, सचिव हेमंत पोखरणा, मंत्री डॉ. महेंद्र पटवा, विनोद बलदोटा, कोषाध्यक्ष डॉ उमेश गाधी, विश्वस्त उपाध्यक्ष बाबुलाल भंडारी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. गांधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नंदकुमार राठी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करणार असून, डॉ. अमोल कल्याणकर उद्द्घाटन सत्राचे सूत्रसंचालन करणार आहेत. उद्घाटनानंतर व्दिसत्रीय बीज भाषणात प्रा. राधेश्याम प्रधान, प्रा. डॉ. बी. एन. शिंदे, डॉ. सुरुची पांडे, डॉ. सय्यद अझरुद्दीन, डॉ. के एम जाधव, डॉ. संजय चाकणे आदी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. दुपारच्या चर्चा सत्रात विभागनिहाय शोधनिबंधाचे सादरीकरण होईल. तर बुधवार दि २४ जानेवारीला दिवसभर विभाग निहाय चर्चासत्र होणार आहेत. सदरील आंतरराष्ट्रीय परिषदेच्या समारोपासाठी निरंतर शिक्षणचे संचालक डॉ. आनंद वाघ, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ उपविभाग लातूरचे संचालक डॉ. राजेश शिंदे डॉ. बाम् उपविभाग धाराशिवचे संचालक डॉ. सुयोग अमृतराव, मराठवाडा विद्यापीठाचे अधिसभा सदस्य प्राचार्य डॉ. हरिदास विधाते, प्राचार्य सोपानराव निबोरेंसह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या परिषदेस प्राध्यापक, संशोधक विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. असे आवाहन पाचार्य डॉ. नंदकुमार राठी, परिषदेचे संयोजक सचिव डॉ. गवळी नरेंद्र व डॉ. रसाळ योगेश यानी केले आहे.
-------%%-------
0 Comments