प्रा. डॉ. बबन चौरे यांची बाबुजी आव्हाड महाविद्यालयाच्या उपप्राचार्य पदी नियुक्ती

पाथर्डी - येथील बाबुजी आव्हाड महाविद्यालयाचे हिंदी विभागप्रमुख प्रोफेसर डॉ. बबन चौरे यांची महाविद्यालयाच्या उपप्राचार्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रा. डॉ. बबन चौरे हे गेली 23 वर्ष बाबुजी आव्हाड महाविद्यालयात हिंदी विभागप्रमुख म्हणून कार्यरत असून त्यांना हिंदीतील प्रख्यात साहित्यिक सूर्यकांत त्रिपाठी निराला यांच्या साहित्यकृतीवरील  शोधकार्यासाठी  डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाने पीएच.डी. पदवी बहाल केली आहे. 

ते सध्या पुणे विद्यापीठाचे हिंदी विषयाचे संशोधन मार्गदर्शक म्हणून काम करत असून त्यांनी विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात रिसोर्स पर्सन म्हणून आपली व्याख्याने दिली आहेत. डॉ. चौरे यांचे आतापर्यंत विद्यापीठ अनुदान आयोगाचे दोन लघु शोधप्रकल्प तसेच ३० शोधनिबंध व ३ पुस्तके प्रकाशित झालेले असून त्यांना राष्ट्रीय हिंदी परिषद मेरठ यांच्यावतीने दिला जाणारा हिंदी भूषण पुरस्काराबरोबरच अन्य तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध समित्यांवरही काम केले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड, उपाध्यक्ष एड सुरेशराव आव्हाड, सर्व कार्यकारिणी सदस्य, प्राचार्य डॉ. जी.पी. ढाकणे आदींनी त्यांचे अभिनंदन केले.

 

Post a Comment

0 Comments