कडा / वार्ताहर - येथील बसस्थानकात प्रवासी महिला, पुरुषांसह विद्यार्थ्यांची गर्दी असते. मात्र या बसस्थानकात बेवड्यांचे वास्तव्य वाढले आहे. एका बेवड्याने लघुशंकेसाठी स्वच्छतागृहात गेलेल्या महिलेचा रस्ता अडवून धरल्यामुळे महिला प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. या घटनेमुळे कडा बसस्थानकात महिलांची सुरक्षा सध्या राम भरोसे झाली आहे.
आष्टी
तालुक्यातील कडा बसस्थानक मराठवाड्याचे प्रवेशद्वार असल्यामुळे येथून दररोज लांब
पल्ल्याच्या पन्नासच्या आसपास एसटी बस नियमित धावतात. बसस्थानकात प्रवासी महिला व
पुरुषांकरिता स्वच्छतागृहाची सुविधा असली तरी याठिकाणी स्वच्छतागृहाला कुठलाही
आडूसा नाही. या परिसरात दिवसेंदिवस दारूच्या नशेत तर्रर तळीरामांची संख्या वाढत
आहे. बसस्थानकात चढउतार करताना प्रवासी महिलांसह शालेय मुलींच्या छेडछाडीच्या घटना
वाढल्या आहेत. गुरुवारी तुळजापूर-नाशिक बसमधून नगरला जाणाऱ्या मायलेकी कडा
बसस्थानकात थांबल्या होत्या. या महिला लघुशंकेसाठी स्वच्छता गृहात जाताना एका
बेवड्या तळीरामाने त्यांचा रस्ता अडवून विचित्र हावभाव केले. मात्र हीबाब
बसस्थानकातील इतर प्रवास्यांच्या निदर्शनास येताच, तळीरामाला
यथेच्छ पाहुणचार करुन पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले. मात्र या घटनेमुळे प्रवासी
महिला वर्गात भीतीचे वातावरण आहे.
तळीरामाला
यथेच्छ चोप
बसस्थानकात
घडलेला हा गलिच्छ प्रकार संबंधित महिलेने वाहतूक नियंत्रकांना सांगत असतानाच,
बसस्थानकात उपस्थित इतर प्रवाशांनी त्या तळीरामाला पकडून यथेच्छ चोप
देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. या संदर्भात आगारप्रमुख चोथमल यांच्याशी संवाद
साधला असता ते म्हणाले की, असे छेडछाडीचा प्रकार होत असेल तर
पोलिसांना पत्रव्यवहार करणार असल्याचे सांगितले.
0 Comments