पर्यावरण समतोल राखण्यासाठी समाजाची मानसिकता बदलण्याची गरज :- डॉ.बी.एन.शिंदे.

 


कडा  :- हवामानातील बदलामुळे पृथ्वीवर येणाऱ्या विविध संकटातून सावरण्यासाठी समाजाची मानसिकता बदलण्याची व जनमत तयार करण्याची गरज आहे. असे प्रतिपादन प्रसिद्ध हवामान तज्ञ प्रा. डॉ. बी.एन.शिंदे यांनी केले. 

श्री अमोलाक जैन शिक्षण संस्थेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त आयोजित हवामानातील बदल आणि आत्मनिर्भर भारता पुढील आव्हाने या विषयांवरील दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेत बीज भाषणात ते बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष योगेश भंडारी, कार्याध्यक्ष कांतीलाल चाणोदिया, विश्वस्त अध्यक्ष गोकुळदाष मेहेर, प्रधानमंत्री हेमंत कुमार पोखरणा, कोषाध्यक्ष डॉ. उमेश गांधी, उपाध्यक्ष अनिल झाडमुथा, बिपिन भंडारी, संचालक संजय मेहेर, संतोष गांधी, संजय कोठारी, संतोष भंडारी, ललित कुमार कटारिया, अनिल मेहेर, डॉ. राधेश्याम प्रधान, उच्च शिक्षण विभागाचे सह संचालक सुरेंद्र ठाकूर, प्रा. डॉ. के. एम. जाधव, डॉ. संजय चाकणे, डॉ. व्यंकटेश लांब, डॉ. सय्यद अजरुद्दिन, हवामान तज्ञ डॉ. बी. एन. शिंदे, डॉ. सुरुची पांडे, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे शाखा व्यवस्थापक धीरज सूर्यवंशी, प्राचार्य डॉ. नंदकुमार राठी, प्राचार्य हरिदास विधाते, प्राचार्य डॉ. सोपानराव निंभोरे, संस्थेचे कार्यकारी अधिकारी प्रा. नवनाथ पडोळे, बी. फार्मसी चे प्राचार्य डॉ. गफार सय्यद, डि. फार्मसी चे प्राचार्य डॉ. महेश म्हस्के, विद्यालयाचे मुख्याध्यापक मथाजी शिकारे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. 

यावेळी डॉ. बी. एन. शिंदे यांनी जगत संजीवनी व संजीवनी विद्या हे दोन सिद्धांत मांडले. ते म्हणाले, जेव्हा सूर्य प्रकाश जमिनीवर पडतो, तेव्हा जमीन तापते. जमिनीवर जर जंगल नसेल हवा प्रसारण पावते. हवेच्या दाबाचा पट्टा तयार होतो. आजूबाजूची हवा आतमध्ये येते. त्यामुळे चक्रीवादळे होतात. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पृथ्वीवर ३३ टक्के जंगलाचे प्रमाण असणे आवश्यक आहे. परंतु भारतात फक्त ११ टक्के जंगल आहे. अलीकडच्या काळात ग्रामीण भागातून सुद्धा घरोघरीच्या चुली जाऊन चुलीच्या जागेवर गॅस शेगडी आली त्यामुळे वृक्षतोडीचे प्रमाण कमी झाले. आणि पृथ्वीवरील वृक्षाचे प्रमाण १४ टक्के एवढे वाढले. झाडे लावा, झाडे जगवा ही शासनाची योजना फक्त कागदावरच राहते. आपल्याला वृक्ष लागवडीचे कोट्यवधीचे आकडे सांगितले जातात. मात्र त्यातील किती झाडे जगले याचे उत्तर कुणीही देऊ शकत नाही. त्यामुळे इथून पुढे काडीने औषध लावून चालणार नाही. दिवसेंदिवस पडीक जमिनीचे प्रमाण वाढत आहे. शेतकऱ्यांचा भर नगदी पिकांवर आहे. धान्याची सरासरी उत्पादकता कमी झालेली आहे. इथून पुढे ५० टक्के शेती करावी. त्यापैकी २५ टक्के जमिनीवर नगदी पिके घ्यावेत. १५ टक्के जमिनीवर फळ शेती करावी तर ३० टक्के जमिनीवर वृक्ष लागवड करावी. वृक्ष शेती केली तर पावसाचे प्रमाणही वाढेल असे ते म्हणाले. 

डॉ. सुरुची पांडे म्हणाल्या की, आंतरशाखीय अभ्यास हा निसर्गाचे संरक्षण आणि संवर्धनासाठी महत्त्वाचा आहे. प्राचीन भारतीय ग्रंथ व तत्वज्ञान यांचा अनमोल वारसा अधिक चांगला समजून घातला हवा. प्राचीन भारतीय साहित्यातून वृक्ष, पक्षी, प्राणी, जैव्य विविधता यांचा निश्चित संदर्भ मिळतात. त्यावरून त्या जैव विविधतेचे अस्तिव आपल्या लक्षात येते. निसर्ग वाचविण्यासाठी विविध संस्कृतींचा सहृदय विचार व्हायला हवा तसेच माणसातील संवेदनशीलता देखील जागवायला हवी. डॉ. सतीश पांडे, डॉ. सुरुची पांडे आणि त्यांचे सहकारी पुण्यातील इला फाउंडेशन या त्यांच्या संस्थेमार्फत हे काम गेल्या २५ वर्षांपासून करीत आहेत. 

पिंगोरी येथे त्याचे ग्रामीण केंद्र असून तिथेही निसर्ग व पर्यावरण विषयक अनेक प्रकल्प राबविले जातात. महाराष्ट्र राज्य वन विभागासह त्यांचे वन्य जीव हॉस्पिटल कार्यालय कार्यरत आहे. यावेळी डॉ. राधेश्याम प्रधान म्हणाले की, मानवाने हवामान बदलामुळे पर्यावरण संवर्धनाची गरज ओळखून आपली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडावी. विकसित व विकसनशील राष्ट्रांना यासाठी कृतीपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे. प्रत्येक राष्ट्राने शिक्षण प्रणाली मध्ये धोरणात्मक बदल करून या चळवळीला जनसामान्यांची चळवळ म्हणून महत्त्व प्राप्त करून द्यावे. असे ते म्हणाले. यावेळी डॉ. के. एम. जाधव यांचीही भाषणे झाली. प्रा. डॉ. राधाकृष्ण जोशी यांनी प्रसिद्धीची जबाबदारी पार पाडली. डॉ. नरेंद्र गवळी यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. कुलकर्णी यांनी आभार मानले.

ग्रामिण भागात होणा-या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेत विविध विषयावरील चर्चेचा फायदा येणाऱ्या पिढीला होणार आहे. कारण ही संस्था मागील शंभर वर्षांपासून नि:स्वार्थीपणे ज्ञानदानाचे पवित्र कार्य करीत आहे. समाजाचे आरोग्य, शिक्षण, समाजसेवा व संस्कृती रक्षणासाठी अविरतपणे कार्य करीत राहिल. जैनाचार्य श्री अमोलक ऋषी महाराज यांनी घालून दिलेल्या शिकवणुकीनुसार संस्थेची यशस्वी वाटचाल सुरू आहे.असे हेमंत पोखरणा, सचिव, अमोलक जैन शिक्षण संस्था कडा यांनी सांगितले. 

Post a Comment

0 Comments