पाथर्डी – महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद संलग्न भारतीय कुस्ती संघ यांच्या वतीने रत्नागिरी येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत मालेवाडी येथील जयेश जाधव याने कास्य पदक मिळवले असून त्याच्या या कामगिरी बद्दल तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद संलग्न
भारतीय कुस्ती संघ व ऑलिंपिक असोसिएशन (मान्यताप्राप्त: महाराष्ट्र राज्य क्रीडा
परिषद) यांच्या वतीने ४४ वी कुमार
राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा रत्नागीरी येथे छत्रपती शिवाजी महाराज
क्रीडा संकुल येथे दिनांक २० ते २१ जानेवारी २०२४ रोजी पार पडली. सदरच्या कुस्ती
स्पर्धेत अहमदनगर जिल्हाचे नेतृत्व करून पैलवान जयेश राजेंद्र जाधव याने ५५ किलो
वजन गटात तृतीय क्रमांक कास्ये पदक पटकावले.
पैलवान जयेश जाधव यास मालेवाडी येथिल कुस्ती
प्रशिक्षण केंद्रातील वस्ताद राजेंद्र जाधव व संतोष कांबळे सतिश गर्जे, दत्ता
तहकिक, संभाजी पठाडे व सहकारी पैलवानांचे मार्गदर्शन लाभले मिळाले धन्यवाद
0 Comments