पाथर्डीत भर दुपारी साडेचार लाख रुपयांची रोकड चोरीस !


पाथर्डी  शहरात कुरिअर वाटप करणाऱ्या गाडी चालकाच्या मालवाहतूक करणाऱ्या गाडी मधून गुरुवारी दुपारी अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम रुपये ४,४३,३९० /- रुपये चोरून पोबारा केला असून याघटने बाबत पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरुद्ध गाडी चालक बाबासाहेब पवार यांनी गुन्हा दाखल केला आहे.  

गुरुवार दिनांक २४ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी बाबासाहेब शिवाजी पवार हे त्यांचे महिंद्रा कंपनीचे जितो मालवाहतूक गाडी नंबर एम एच १४ ९७६२ हिच्या मधून आधुनिक कुरिअर नवी पेठ अहमदनगर येथून गाडीमध्ये कुरिअरचे सामान घेऊन सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास तिसगाव येथे आले व मस्के सराफ येथे पार्सल दिले व त्यांनी फिर्यादीस पार्सलचे १ लाख ९९ हजार ३२० रुपये रोख रक्कम दिले व ते फिर्यादी यांनी त्यांच्या खिशात ठेवून पुढील कुरिअरचे पार्सल देण्याकरता पाथर्डी येथे १२.१५ मिनिटांच्या सुमारास तिरुपती मेडिकल नवी पेठ पाथर्डी येथे दुकानासमोर गाडी उभा करून शेवाळे सराफ यांचे दोन पार्सल देण्यासाठी गेलो व त्यांचे दोन पार्सल दिल्यानंतर त्यांनी फिर्यादीस दोनही पार्सलचे २ लाख ४४ हजार ७० रुपये रोख रक्कम दिली त्यानंतर सदरील रोख रक्कम एकत्र करून फिर्यादी यांनी कागदामध्ये बांधून गाडीच्या डाव्या बाजूच्या डिक्की मध्ये ठेवून डिकी लॉक करून घेतली व गाडी चालू करून गांधी मेडिकल क्रांती चौक येथे उभे केली आणि गुगळे मेडिकल यांचे पार्सल देण्याकरता फिर्यादी गाडीतून उतरून त्यांचे पार्सल दिले.

पुन्हा गाडीत बसून गाडी चालू करून चंदन मेडिकल अजंठा चौक येथे जाऊन चंदन मेडिकल यांचे पार्सल दिले त्यानंतर पुढील पार्सल पोहोचवण्यासाठी शेवगावला जायला  निघाले असता जुने बस स्थानक शेवगाव रोड पाथर्डी येथे पंडित सराफ यांचे रिटर्न पार्सल देण्याकरता घेतले,सदरचे पार्सल डिकीट ठेवण्याकरता दुपारचे एक वाजण्याची सुमारास  डिकी उघडल्या असतात डिकीत ठेवलेली रोख रक्कम दिसली नाही तेव्हा फिर्यादीची खात्री झाली की सदरील रक्कम अज्ञात चोरट्याने चोरून नेहली आहे. चोरी गेलेल्या रकमेमध्ये ५००,२००,१००,१००,२० रुपये दराच्या चलनी नोटा यांचा समावेश आहे असा एकूण ४ लाख ४३ हजार ३९० रुपयांची रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी चोरून नेहली असल्याची फिर्याद बाबासाहेब शिवाजी पवार धंदा आधुनिक कुरियर ड्रायव्हर नक्षत्र लोन,बुरुडगाव रोड यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात नोंदवली आहे.

पाथर्डी पोलिसांनी सदरील घटनेच्या अनुषंगाने शहरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून काही संशयित निष्पन्न केले असून त्या दृष्टीने तपास सुरू असल्याबाबत पोलीस उपनिरीक्षक सचिन लिमकर यांनी सांगितले.

  • दरम्यान आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास एक वयोवृद्ध महिला केळवंडी येथून माणिकदौंडी येथे जाण्यासाठी निघाली असता त्या महिलेस अज्ञात ४ इसमानी माणिकदौंडी येथे सोडतो असे सांगून बळजबरीने पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये बसवले व माणिकदौंडी घाटामध्ये जाताच सदरील महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने बळजबरीने चाकूचा धाक दाखवून काढून घेतल्या बाबत फिर्याद देण्याबाबत सदरील वयोवृद्ध महिला पाथर्डी पोलीस ठाण्यात आली होती उशिरापर्यंत फिर्याद दाखल करण्याचे काम सुरू होते.
  • दरवर्षीप्रमाणे यंदाही जसजशी थंडीचा कडाका वाढत आहे तसा तसा चोरांनी देखील आपला कार्यभाग कडाक्याने साध्य करण्यास सुरुवात केली असल्याने तालुक्यातील व्यापारी शेतकरी व प्रवासी चोरट्याच्या भयाने हवालदार झाले आहेत. मागील काही कालावधीत चालत्या वाहनातून रोख रक्कम व दागिने चोरी करण्याचे प्रमाण वाढले असून पोलिसांनी याचा वेळीच छडा लावून चोरट्यांच्या मुस्क्या आवळण्याचे मागणी जनसामान्यातून होत आहे.



Post a Comment

0 Comments