अवैध वाळू डंपर मालकाला ४,४०,६०० रुपये दंड !

पाथर्डी भवरवाडी शिवारात अवैध वाळू वाहतूक करताना डंपर प्रांताधिकारी प्रसाद मते यांच्या पथकाने पकडला असून तहसिलदार शाम वाडकर यांनी वाळु वाहतुक करणा-या ढंपर मालकाला ४,४०,६०० रुपये दंड भरण्याबाबतची नोटीस बजावली आहे. 

पांडुरंग ज्ञानदेव सुळ रा.मिडसांगवी यांचा वाळुचा ढंपर मिडसांगवी येथे मराठी शाळेच्या बांधकामासाठी हि वाळू आणली असल्याचे बोलले जात असून स्थानिक माहितीच्या आधारे छापा मारून वाळुचा ढंपर MH-16AB-1663 हा प्रांतअधिकारी प्रसाद मते यांनी पकडला व डंपर मालक सदरील वाळू वाहतूक परवाना सादर करू न शकल्याने चौकशी नंतर तहसिलदार शाम वाडकर यांनी याबाबत वाळू वाहतूक दाराला ४,४०,६०० रुपये दंड भरण्याची नोटीस बजावली आहे.

  • तालुक्यात वाळु व मुरमाची वाहतुक सर्रास सुरु असून महसुल प्रशासनाने यावर कठोर कारवाई करणे अत्यावश्यक आहे. वाळुतुन पैसा व पैशातुन दादागिरी  आणि पैशातुन निवडणुका जिंकायच्या व पुन्हा सत्ता मिळवायची असे दृष्ठ चक्र तालुक्यात सुरु आहे. अनेकजण रासरोसपणे वाळू व इतर गौण खनिज विकतात मात्र कारवाई मात्र ठराविक जणावरच केली जाते. अशा तक्रारी वाढत आहेत. वाळु तस्कराविरुद्ध महसुल प्रशासनाने मोहीम उघडून ठोस कारवाई केली पाहीजे.


Post a Comment

0 Comments