मोहटादेवी इथून शिवस्वराज्य यात्रेचा प्रारंभ आज जोश
पूर्ण वातावरणात केला. त्यानंतर पाथर्डीच्या शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार
परिषदेत त्या बोलत होत्या.शिवराज्याभिषेक सोहळ्यास 350 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल नगर लोकसभा मतदारसंघात आमदार निलेश
लंके यांच्या पुढाकाराने शिवस्वराज्य यात्रा आज श्री क्षेत्र मोहटा देवीला महापूजा
करून सुरू झाली.
यावेळी निलेश लंके
प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष पोटघन मेजर, करंजीचे सरपंच रफिक शेख, चांद मणियार,अर्जुन धायतडक, उबेद आतार, बबलू
वावरे आदी प्रमुखांसह निवडक कार्यकर्ते उपस्थित होते. नगर मतदारसंघात भाजपच्या
वतीने खासदार डॉ. सुजय विखे यांची उमेदवारी गृहीत धरली जाते. मात्र निलेश लंके प्रतिष्ठानच्या
कार्यकर्त्यांनी शहरातील क्रांती चौकात उद्घाटनाची सभा घेतली. राणीताई लंके व
आमदार निलेश लंके यांचे पोस्टर असलेल्या जीपवर लाऊड स्पीकर लावून सभेसाठी व्यासपीठ
तयार करण्यात आलेले आहे. विविध गाड्यांचा ताफा व प्रतिष्ठानचे पदाधिकारी एकाच वेळी
या रथातून गावोगावी जातात. तेथे शिवराज्याभिषेकावर व्याख्यान दिले जाते. यावेळी
राणी लंके यांनी मोजक्या या शब्दात पत्रकारांशी संवाद साधला. आगामी लोकसभा निवडणूक
डोळ्यापुढे ठेवून शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन नगर लोकसभा मतदारसंघात होऊन आमच्या
दोघांपैकी कोणीही एक जण निवडणूक निश्चित लढवणार आहे.
मतदारसंघातील प्रमुख
गावांमध्ये यात्रा जाईल. तेथे अभ्यासू वक्ते व्याख्यान देऊन तरुणाईला शिवरायांच्या
पराक्रमाची माहिती देतील. पंधरा दिवसांनी नगर येथे यात्रेची सांगता होईल.
प्रतिस्पर्धी उमेदवार कोण आहे याकडे लक्ष न देता आम्हाला उमेदवारी करायचे आहे असा
निर्धार आम्ही केला आहे. लोकांची व कार्यकर्त्यांची तशी भावना आहे. सर्वसामान्य
लोकांना न्याय मिळाला पाहिजे असा आमचा निर्धार आहे. याबाबत आमदार साहेब लवकरच विस्तृत
भूमिका मांडतील, असे राणीताई लंके म्हणाल्या.
0 Comments