महिलांच्या शिक्षणासाठी दिलेला लढा व्यर्थ जाऊ नये -उपजिल्हाधिकारी सौ. सावंत

 

करंजी -आज प्रत्येक क्षेत्रात मुली मुलांच्या बरोबरीने काम करीत आहेत, हे फक्त शिक्षणामुळेच शक्य झाले आहे, सावित्रीबाई फुले यांनी महिलांच्या शिक्षणासाठी जो लढा दिला तो व्यर्थ जावु नये यासाठी मुलींनी खुप शिकले पाहिजे असे मत उपजिल्हाधिकारी सौ. गौरी सावंत यांनी येथील नवनाथ विद्यालयातील सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त बोलताना व्यक्त केले. 

श्री नवनाथ विद्यालयात उपजिल्हाधिकारी सौ. गौरी सावंत यांच्या हस्ते भव्य क्रिडांगणाचे उदघाटन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विस्तार अधिकारी  सौ. मनिषा कुलट होत्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सौ. सावंत यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. आपल्या प्रमुख भाषणात सौ. सावंत पुढे म्हणाल्या की आज प्रत्येक क्षेत्रात मुली मुलांच्या बरोबरीने काम करीत असुन प्रत्येक क्षेत्रात त्या आघाडीवर आहेत. सावित्रीबाई फुले यांनी महिलांना शिक्षण मिळावे यासाठी घेतलेले परिश्रम शब्दात व्यक्त करता येणार नाहीत, त्यांचा लढा व्यर्थ जावु नये यासाठी मुलींनी खुप शिकुन मोठे व्हावे, आज मुलींना शिक्षणाच्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध आहेत, आपण आपल्या आवडीनुसार विषय निवडुन आपले ध्येय पुर्ण करण्याचा सल्ला त्यांनी यावेळी विद्यार्थी व विद्यार्थींना दिला.

विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय  म्हस्के यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करुन उपस्थितांचे स्वागत केले. स्वप्नील लवांडेसर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी विद्यालयातील सर्व महिला शिक्षीकांचा मुलींनी सत्कार केला.पर्यवेक्षक सुरेंद्र येठेकर, जगदाळे, पिंपळे, घोरपडे, श्रीकांत अकोलकरसह सर्व शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी हजर होते. संस्थेचे अध्यक्ष, सेक्रेटरी, सहसेक्रेटरी यांनी शिक्षकांचे अभिनंदन केले. शेवटी स्वप्नील लवांडेसर यांनी सर्वाचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments