महसूल मंत्र्यांच्या जिल्ह्यात आनंदाचा शिधा आता ऑनलाईन शोधा !

पाथर्डी - तालुक्यातील गोरगरीब जनतेसाठी शासनाच्या पुरवठा विभागाच्या वतीने वितरीत केला जाणाऱ्या आनंदाचा शिधा वाटपात ७१ लाखांचा शासकीय भरणा याच कामासाठी नेमणूक केलेल्या खाजगी इसमाने घेवून पोबारा केल्याने तालुक्यातील रेशन दुकानदारमध्ये खळबळ उडाली असून त्यामुळे रेशन वाटपात शिथिलता आल्याने सामान्य नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

शासकीय पगारातून जनतेच्या हितासाठी चालणारी यंत्रणा अस्तित्वात असताना पाथर्डी पुरवठा विभागामध्ये मात्र खाजगी इसम नेमून पुरवठा विभागाला नेमके काय साध्य करायची याबाबत प्रश्न आता जनसामान्यातून विचारला जात आहे. याशिवाय या घटनेतून ऑनलाईन रेशन वाटपात खाजगी माणसे नेमून फेरफार करणारे रॅकेट तर चालवले जात नाही ना याची देखील शंका उपस्थित होत आहे. शासनाच्या सोयीच्या धोरणाचा गैरवापर करून गोरगरीब जनतेच्या मुखातला घास काढण्याचे पाप शासकीय यंत्रणाच करत असल्याचे या घटनेतून उघड होत आहे. पाथर्डी पुरवठा विभागात त्रयस्त इसमाची नेमणूक करून त्याच्यामार्फत रेशन दुकानदार आपली रेशन साठी जमा होणारा शासकीय भरणा जमा करण्याचे काम उघडपणे करत आहेत. शासकीय यंत्रणा अस्तित्वात असताना त्रयस्त इसम नियमाची गरज का निर्माण झाली. याशिवाय शासकीय कार्यालयामध्ये खाजगी इसम अगर एजंट नेम प्रतिबंधित असताना देखील कुणाच्या सांगण्यावरून पुरवठा विभागांमध्ये त्रस्त इसमाची नेमणूक जमा करून लाखो रुपये जमा करण्यात आले याचा देखील उलगडा या निमित्ताने होणे आवश्यक आहे.

सदर घटनेतील रेशनिंगचा शासकीय भरणा हा सरळ सरळ त्रयस्थ इसमाने ऑनलाइन सट्टा तसेच जुगार खेळण्यासाठी वापरला गेल्याचे उघड बोलले जात आहे यातून शासकीय यंत्रणा किती तकलादू व गोपनीयतेचा भंग करणारी आहे हे या घटनेवरून उघड होते. रेशन विभागात पुरवठा विभागात चालणारी गैरप्रकार सोयीस्कर रित्या चालण्यासाठी खाजगी माणसाची नेमणूक करून बिंदिकत पणे असे अनेक कृत्य आजही सुरू आहेत. प्रशासनाला प्रशासकीय अधिकाऱ्यांना अशा त्रस्त इसमांना पाठीशी घालून नेमके काय साध्य करायचे हे यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जिल्ह्यात तरी अशा प्रकारचे फसवणूक अपहार होणे अभिप्रेत नाही. परंतु दिव्याखाली अंधार या म्हणीप्रमाणे महसूलमंत्र्यांच्या जिल्ह्यातच आनंदाचा शिधा आता ऑनलाइन शोधा अशी अवस्था निर्माण झाल्याचे चित्र आहे.

  • तालुक्यातील १४० दुकानदारांनी सुमारे ७१ लाख रुपये खाजगी व्यक्तीकडे दिले आहेत. त्याने ते पैसे सरकारी तिजोरीत भरले नाहीत. दुकानदारांना पुरवठा विभाग आता हे पैसे भरा असा तगादा करीत आहे. आम्ही पैसे दिले आहेत.पुन्हा पैसे भरण्याचे कारण काय. तो माणुस सरकारी वाँटसअप गृपमधे कसा. त्याने व अव्वल कारकुन यांनी दुकानदारांनी वेळोवेळी सुचना दिलेल्या आहेत. तालुका पुरवठा अधिकारी यांची जबाबदारी नेमकी काय. महसुलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी पुरवठा विभागाची चौकशी करण्याची मागणी होत आहे.  
  • सदरील खाजगी इसमाशी तहसिल अथवा पुरवठा विभागाचा काही संबध नाही. आम्ही कोणाकडेही पैसे द्या असे सांगितलेले नाही. तहसिल कार्यालयाच्या बाहेर दुकानदारांनी कोणाकडे पैसे दिले याच्याशी आमचा काही संबध नाही. दुकानदारांनी पैसे भरावेत. अनेक तालु्क्यातील दुकानदारांचे पैसे भरावयाचे राहीले आहेत असे तहसीलदार शाम वाडकर, यांनी सांगितले.

पुरवठा विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांनी सांगितलेल्या खाजगी माणसाकडे स्वस्त धान्य दुकानदारांनी लाखो रुपये भरले आहेत. तो माणुस पैसे घेवुन पसार झाला आहे. काही दुकानदार घेवुन त्याच्या वडीलाकडे आम्ही गेलो होतो. आठ दिवसात पैसे देण्याचे त्याच्या  वडीलांनी कबुल केले आहे. पुरवठा शाखेचे हा व्यक्ती २०१६ पासुन काम करीत आहे. पुरवठा विभागातील अधिका-यांनी सांगितले म्हणुनच आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला आहे. दुकानदार अडचणीत सापडले आहेत. काही दुकानदारांना ह्रदयरोगाचा त्रास आहे. उद्या काही कमी जास्त झाले तर त्याला जबाबदार कोण राहील असे शिवाजीराव मोहीते , अध्यक्ष, स्वस्त धान्य दुकानदार यांनी सांगितले.

 


Post a Comment

0 Comments