त्यांच्या बालसाहित्य विषयक संशोधनाला डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ ची विद्यावाचस्पती (पीएच.डी.) पदवी प्राप्त झाल्यामुळे सत्काराचे औचित्य होते. यावेळी शाळेतील इयत्ता सहावी आणि सातवीच्या विद्यार्थीनीं कु. पुजा हंडाळ व कु.कविता खांडेकर यांनी डॉ विठ्ठल जाधव सरांची मुलाखत घेतली. त्यांनी दिलेली दिलखुलास उत्तरे विद्यार्थ्यांना खूप आवडली. डॉ जाधव यांनी भाषणातून विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना कविता म्हटल्या. त्याला विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवून व सोबत म्हणून उत्सुर्तपणे प्रतिसाद दिला. यावेळी बोलताना डॉ. जाधव म्हणाले की,बालकांना आवडणारी बालसाहित्य लिहायला हवे. बालसाहित्य बालकांच्या वास्तवाला भिडणारे,त्याचे बालसुलभ जगणे समजून घेणारे असावे.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन रमेश गर्जे सरांनी केले. तर कार्यक्रमाची सर्व तयारी विजय गायकवाड सरांनी केली.
0 Comments