पाथर्डी - शेवगांव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात जलसंधारण महामंडळाकडून १५ बंधाऱ्यांसाठी रु. कोटी ३२ लक्ष मंजूर झाले असल्याने तालुक्यातील सिंचनाची व्यवस्था होण्यास हातभार लागणार असल्याचा विश्वास आ.मोनिका राजळे यांनी व्यक्त केला आहे.  

यामध्ये को.प.बंधारे व द्वार युक्त सिमेंट बंधाऱ्याचा समावेश आहे. जलसंधारण महामंडळाकडून सदर बंधारे मंजूरीसाठी राज्याचे जलसंधारण मंत्री ना. संजय राठोड यांचेकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे ही कामे मंजूर झाली आहेत. मागील दीड वर्षात अनेक गांवात साठवण बंधाऱ्याचे कामे झालेली आहेत. त्यामुळे अनेक गांवातील शेतीच्या व पिण्याचे पाण्याचा प्रश्न मार्गी लागत आहे. या मंजूर कामामध्ये बालमटाकळी ३६.३८ लक्षअधोडी ४६.८८ लक्षठाकूर पिंपळगांव ७२.२५ लक्षशिंगोरी (गुट्टे वस्ती) ५०.८८ लक्षभापकरवाडी ३६.०३ लक्षआल्हणवाडी क्र.(महालदरा) ६२.७० लक्षआल्हणवाडी क्र. (खांडगे वस्ती) ५६.८२ लक्ष,जाटदेवळा (अडळवाडी) ४६.९९ लक्षआल्हणवाडी क्र.(फुंदेवस्ती) ४०.२५ लक्षमानेवाडी नं.१  ४७.०२ लक्षमालेवाडी नं.१ – ६३.५२ लक्षमालेवाडी नं.२  ६३.४२ लक्षपिंपळगांव टप्पा (मंदिराजवळ) १०.६१ लक्षनागलवाडी (झोटींग मळा) ४८.८९ लक्षखापिंप्री (पुलाजवळ) ५४.०९ लक्ष या कामांना मंजूरी मिळालेली आहे. ही कामे मंजूर केल्यामुळे  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजितदादा पवारजलसंधारण  मंत्री संजय राठोडपालकमंत्री राधाकृष्ण विखे पा. खासदार डॉ. सुजय विखे पा. यांचे आमदार मोनिकाताई राजळे यांनी आभार मानले.