पाथर्डी वकील संघाचे ९ फेबृवारी पर्यंत कामबंद आंदोलन !

पाथर्डी - येथील वकील संघटनेच्या वतीने राहुरी येथील वकील दांपत्य अॅड. राजाराम आढाव व त्यांची पत्नी अॅड. मनिषा आढाव यांच्या खून प्रकरणी निषेध नोंदवत येत्या ९ फेब्रुवारी पर्यंत न्यायालयीन कामकाजात सहभागी न होण्याचा ठराव संमत केला आहे.

राहुरी न्यायालयात वकिली करणारे आढाव दांपत्य यांचे अपहरण करुन त्यांचा निर्घृण खून करुन त्यांचे मृतदेह उंबरे गावातील स्मशान भुमी जवळील विहिरीत टाकुन दिले होते त्याबाबत गुन्हे दाखल होवून आरोपींना अटकही करण्यात आली मात्र या घटनेची निषेध सभा २ फेब्रुवारी रोजी राहुरी येथील न्यायालयात झाली. सदर सभेस अहमदनगर जिल्हयातील वकीलसंघाचे पदाधिकारी व सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते.

परिस्थितीचे गांभिर्य ओळखून वकिलावर होणारे हल्ले थांबवले जावेत यासाठी शासनाने अॅडव्होकेटस् प्रोटेक्शन कायदा संमत करावा या प्रमुख मागणीसाठी अहमदनगर जिल्हयातील सर्व न्यायालयातील कामकाजा पासुन दिनांक ०९/०२/२०२४ पर्यंत सर्व वकीलांनी अलिप्त रहावे असा निर्णय घेणेत आला.त्याच अनुषंगाने येत्या ०९ फेब्रुवारी पर्यंत पाथर्डी न्यायालयातील कामकाजा पासुन पाथर्डी बार असोसिएशनचे सदस्य, वकील अलिप्त राहतील असा ठराव संमत करून या ठरावाची प्रत वकील संघटनेच्या वतीने वकील बांधवानी नायब तहसीलदार भानुदास गुंजाळ यांना देण्यात आली आहे.

 

Post a Comment

0 Comments