पाथर्डी - दिनांक ६ ते ९ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत हिमाचल प्रदेश केंद्रीय विद्यापीठ, धर्मशाला येथे होणाऱ्या मुलींच्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ वेटलिफ्टींग स्पर्धेसाठी बाबुजी आव्हाड महाविद्यालयाच्या दोन खेळाडूंची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संघात निवड झाली आहे. ४५ किलो वजन गटात हर्षदा गरुड व ८७ किलो वजन गटात योगिता खेडकर यांची निवड झाली आहे.
सदर स्पर्धेसाठी राजमुंद्री, आंध्र प्रदेश येथे झालेल्या दक्षिण पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ वेटलिफ्टिंग स्पर्धेमधून प्रत्येक वजन गटात टॉप १६ खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. या यशाबद्दल पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड, उपाध्यक्ष ॲड. सुरेशराव आव्हाड, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जी.पी. ढाकणे, उपप्राचार्य डॉ. बी. ए. चौरे तसेच अहमदनगर डिस्ट्रिक्ट वेटलिफ्टिंग असोसिएशनचे अध्यक्ष प्रा. सुभाष देशमुख उपाध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांनी या खेळाडूंचे अभिनंदन केले. त्यांना शारीरिक शिक्षण संचालक प्रा. डॉ. विजय देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले.
0 Comments