करंजी - पाथर्डी तालुक्याच्या पश्चिम भागाला वरदान
ठरलेली वांबोरी चारीला गेल्या अनेक दिवसापासुन पाणी चालु असुनही वांबोरी चारीचे
पाणी पाथर्डी तालुक्याच्या दुष्काळी पश्चिम भागाला मिळत नसल्याने वांबोरी चारी या
भागासाठी शाप ठरत आहे.
पाथर्डी तालुक्याच्या दुष्काळी पश्चिम भागाला पाणी मिळावे म्हणुन ही योजना अंमलात आणली. यावर्षी वांबोरी चारीला गेल्या दिवसापासुन पाणी चालु आहे मात्र या योजनेचे पाणी महिनाभरात पांढरीपुलाच्या पुढे आलेच नाही. पाथर्डी तालुक्याचे हक्काचे पाणी इतरत्र वापरले जात आहे. या भागातील पाझर तलाव कोरडे असताना या योजनेचे पाणी कोणाला दिले जात आहे? असा संतप्त सवाल या भागातील शेतकऱ्यांमधुन विचारला जात आहे.
या भागात पाऊसच कमी झाल्याने पिण्याच्या पाण्याच्या टंचाईबरोबरच, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही या भागातील शेतकऱ्यांसमोर उभा राहीला आहे. या भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. येत्या ३ दिवसात वांबोरी चारीचे पाणी या भागातील तलावात न आल्यास करंजी, तिसगाव, भोसे, सातवड, कौडगाव, घाटसिरससह अनेक गावातील लाभधारक शेतकरी मंगळवार दि. ५ फेब्रुवारी रोजी करंजी बसस्थानकावर रस्ता रोको आंदोलन करतील असा इशारा या गावच्या ग्रामपंचायतच्या पत्राव्दारे दिला आहे.
- येत्या तिन दिवसात वांबोरी चारीचे पाणी पाथर्डी तालुक्याच्या पश्चिम भागातील तलावात पोहचले नाही तर या भागातील शेतकरी ५ फेब्रुवारीला रस्ता रोको आंदोलन करतील-रफिक शेख (शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष)
- वांबोरी चारीला महिन्यापासुन पाणी
चालु आहे, आमचे हक्काचे पाणी
पांढरीच्यापुढे का येत नाही?या भागात पिण्याच्या पाण्याची
टंचाईबरोबरच जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर
प्रश्न निर्माण झाल्याने शेतकरी पुन्हा रस्त्यावर उतरतील-अशोक टेमकर/राजेंद्र पाठक
(सरपंच सातवड)
0 Comments