कत्तल करण्यासाठी डांबून ठेवलेली गायींची सुटका, गुन्हा दाखल


कडा - तालुक्यातील खडकत येथे कत्तल करण्याच्या उद्देशाने विनापरवाना गोवंशीय प्राण्यांना क्रुरपणे वागणूक देत बंदीस्त जागेत डांबून ठेवलेल्या १ लाख ६५ हजार रुपये किंमतीचे ४० वासरे व ५ गायींची सुटका करण्यात आष्टी पोलिसांना मंगळवारी (ता.६) मध्यरात्री १.३० सुमारास यश आले आहे. या प्रकरणी दोन व्यक्तीवर आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून जनावरांना गोशाळेत पाठविण्यात आले आहे.

आष्टी तालुक्यातील खडकत येथे कत्तलखाना असून तो मागील अनेक महिन्यांपासून बंद आहे. परंतु मंगळवारी रात्री १.३० वाजण्याच्या सुमारास पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस यांना खडकत येथे कत्तल करण्याच्या उद्देशाने वासरे व गायी कत्तलखान्यात डांबून ठेवले असल्याची गोपनीय माहिती मिळताच त्यांनी

सहायक पोलिस निरीक्षक विक्रांत हिंगे, पोलीस नाईक प्रविण क्षीरसागर, पोलीस शिपाई अशोक तांबे, चालक भगत यांना सदरील ठिकाणी पाठवले असता त्यांना वरील जनावरे आढळून आली. पोलीस शिपाई अशोक तांबे यांच्या फिर्यादीवरून जमिल बशीर पठाण, मंतजीर अबिदकुरेशी शेख (रा खडकत ता आष्टी) यांच्याविरोधात आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस नाईक प्रविण क्षीरसागर हे करत आहेत. 

Post a Comment

0 Comments