सैनिकांनी देशसेवे सोबत ग्रामविकासाठी योगदान द्यावे !


पाथर्डी – सैनिक सीमेवर उभे राहून देशाची सुरक्षा करतात त्याचप्रमाणे गावातील सर्व वर्गाला एकत्र घेऊन गावाच्या विकासासाठी योगदान द्यावे,  यूवा वर्गाला मार्गदर्शन करावे, गावातील वाद विवाद थांबवन्यासाठी सैन्य दलातील अनुभविची मदत घ्यावी असे प्रतिपादन त्रिदल सैनिक संघाचे अध्यक्ष गोवर्धन गर्जे यांनी जांभळी गावातील शाखेचे उद्घाटन प्रसंगी केले.

संघटनेचे अध्यक्ष गोवर्धन विक्रम गर्जे बोलतांना पुढे म्हणाले कि, जांभळी गावात सर्व सैनिकांनी एकत्र येऊन संघटनेच्या शाखेचे उद्घाटन केले ही अभिमानास्पद बाब असून राजकारण हेवेदावे सोडून तालुक्यातील समाज हितासाठी योगदान देण्यात यावे तसेच जो वर्ग व्यसन व जूगारीकडे अधिन गेला आहे त्यांना मार्गदर्शन करून स्वतः च्या परिवाराचे नुकसान व मुलांचे भविष्य याबाबत संवाद करून मुख्य ध्येयाकडे वळवन्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन गोवर्धन गर्जे यांनी केले.

या उद्घाटन प्रसंगी तालुक्यातील आजी माजी सैनिक मोठ्या संख्यने उपस्थित होते.कोर कमिटी सदस्य व जांभळी गटप्रमुख म्हातारदेव आव्हाड यांच्या प्रयत्नांने व तालुका सचिव सुधाकर आव्हाड यांच्या सहकार्याने तसेच जांभळी गावातील सर्वच सैनिकांच्या योगदानामुळे शाखेचे उद्घाटन मोठ्या जल्लोषात झाले.जांभळी गटप्रमुख म्हातारदेव आव्हाड यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

यावेळी रोहिदास एडके उपाध्यक्ष, कॅप्टन रिटा विठ्ठल तांदळे, रामराव चेमटे, मधुकर चन्ने सहसचिव, दिनकर वेताळ, प्रल्हाद ढाकणे,प्रदीप टेमकर करंजी गटप्रमुख, बद्रीनाथ मरकड मढी गटप्रमुख शिवनाथ ढोले  टाकळी मानूर गटप्रमुख, भानुदास केदार कोरडगाव गट प्रमुख, रमेश कराळे धामणगावदेवी गटप्रमुख, सचिन आमटे, रामकिसन कुटे, रामनाथ भाबड, मच्छिंद्र राठोर, भिमराव रोकडे, अप्पा घनवट, लक्ष्मण बडे,  अर्जुन शिरसाट, कांता देवढे, अंबादास कोरडे, श्रीकृष्ण दौंड, जनार्दन बासमारे, महादेव आंधळे तसेच गावातील उपस्थित सैनिक दत्तात्रय घुगे,  पांडुरंग आव्हाड, निखिल आव्हाड, बाबासाहेब आव्हाड,  रविन्द्र आव्हाड, रुस्तम आव्हाड, महादेव आव्हाड, संजय आव्हाड, भाऊसाहेब आव्हाड,  विनोद आव्हाड, वैभव घुगे,  आजीनाथ आव्हाड, करण आव्हाड व गावकरी उपस्थित होते.

 

Post a Comment

0 Comments