जांभळी गाव देश सेवा करणारे तरुण घडविते ही अभिमानाची बाब - डॉ. क्षितिज घुले

पाथर्डी – जांभळी देश सेवा करणारे तरुण घडविते ही अभिमानाची बाब असून देश सेवेसाठी तरुण या गावात घडतात याचा सर्वाना अभिमान आहे. प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करून अनेक युवक आर्मी व पोलिस,डॉक्टर, इंजिनियर, वकील अशा अनेक क्षेत्रामध्ये देशसेवा करतात.परंतु केंद्र व राज्य शासनाने त्या तुलनेत गावाला काही दिले नाही ही बाब अत्यंत खेदजनक आहे. जनतेबरोबर या गावासाठी विकासकामे करण्यासाठी मोठा वाव असल्याचे डॉ. क्षितिज घुले यांनी सांगितले.  

शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले यांनी पाथर्डी तालुक्यातील मौजे जांभळी या ठिकाणी श्री चैतन्य कानिफनाथ महाराज यात्रा उत्सवानिमित्त उपस्थित राहून त्यांनी चैतन्य कानिफनाथ महाराज यांचे मनोभावे दर्शन घेउन मानाची आरती करून महाराजांच्या आशीर्वाद घेतले यावेळी गावकऱ्यांनी अभूतपूर्व असे स्वागत करून भव्य दिव्य असा सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना सभापती साहेब म्हटले की या गावाचे तरुण देशाची सेवा करतात, यावेळी जांभळी गावातील उपस्थित ह.भ.प. रामकृष्ण महाराज पांगरा गड, डॉ ज्ञानदेव आव्हाड, बाळासाहेब दराडे, सामाजिक कार्यकर्ते किसन आव्हाड, सरपंच विजय आव्हाड, नगरसेवक चाँदभाई मनियार,खरेदी विक्री संघाचे व्हॉईस चेअरमन भगवानराव आव्हाड, मारूती शिरसाट, गणेश आव्हाड, बाबु बिरकड, किरण शिरसाट,विठ्ठल आव्हाड आदीसह हजारो ग्रामस्थ भाविक यावेळी उपस्थित होते.

 

Post a Comment

0 Comments