परीक्षा केंद्रांच्या परिसरात पडला काॅप्यांचा सडा
कडा / वार्ताहर- काॅपीमुक्त दहावी, बारावी परीक्षा अभियान आष्टीत थंडावल्यापासून काॅपी प्रकाराने पुन्हा डोके वर काढले असून, तालुक्यात काही परीक्षा केंद्रांना एखाद्या जत्रेसारखे स्वरुप आल्यासारखे दिसत आहे. या परीक्षा केंद्रांच्या परिसरात तर काॅप्यांचा अक्षरश: सडा पडल्याचे चित्र दिसत आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव होण्यापूर्वी आष्टी तालुक्यात दहावी बारावी परीक्षेत कॉपी नावाचा हा प्रकार पूर्णपणे बंद झाला होता. दहावी बारावीच्या परीक्षा केंद्रावर अक्षरश: शुकशुकाट दिसत असायचा. परंतू सध्या प्रशासनाचा दरारा दिसेनासा झाला असून, या परीक्षा केंद्रांवर टवाळखोरांचा वावर वाढल्याने परीक्षा केद्रांना तालुक्यात एखाद्या जत्रेसारखे स्वरुप आल्याचे पाहावयास मिळत आहे. या परीक्षा केंद्रांच्या परिसरात काॅप्यांचा सडा दिसत आहे. त्यामुळे रात्ररात्र जागून वर्षभर मन लावून अभ्यास करणारे मुलं कॉप्यांचा प्रकार पाहून मनाने खचतात. त्यामुळे या परीक्षा काॅपीमुक्त की, काॅपीयुक्त असा प्रश्न पालक उपस्थित करीत आहेत. बारावीच्या परीक्षा शांततेत होण्यासाठी संबंधितांनी परीक्षा केंद्राच्या परिसरात आजूबाजूला गर्दी करणा-या कॉपी बहादरांवर कारवाई करण्यासाठी पावले उचलण्याची मागणी अभ्यासू विद्यार्थ्यांसह पालकांकडून होत आहे.
0 Comments