येथील स्वर्गीय वंसतराव नाईक यांच्या पुतळ्या समोर नागनाथ गर्जे यांनी गेली पाच दिवस ओबीसी आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीने उपोषण केले. ओबीसी नेत्यांच्या आग्रहास्तव उपोषण स्थगीत करण्यात आले. अँड.गुणरत्न सदावर्ते व टि.पी.मुंडे यांच्याशी व्हीओडीओ काँलवर नागनाथ गर्जे यांचे बोलणे खेडकर यांनी करुन दिले. त्यानंतर अंदोलन स्थगीत करण्यात आले.
नागनाथ गर्जे यांना उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यावेळी नगर येथून ओबीसी नेते सुधाकर आव्हाड, ओबीसी नेते दिलीपराव खेडकर,अनिल कदम,रमेश सानप,संभाजीराव पालवे,अरविंद सोनटक्के,दत्ता खेडकर,किसन आव्हाड,ह भ प आजिनाथ महाराज आंधळे,गोकुळ दौंड,रमेश गोरे,सुभाषराव केकान,अशोक दहिफळे,एडवोकेट संपत गर्जे,महिंद्र शिरसाट, नवनाथ चव्हाण,प्रल्हाद कीर्तने,कृष्णा पांचाळ,विकास नागरगोजे,भालगावचे माजी चेअरमन उद्धव खेडकर,तुकाराम खेडकर,संजय बेंद्रे,अशोक खेडकर,दिलीप दुकानदार,वसंत खेडकर,बाळू जायभाय,सोमनाथ खेडकर,ओमकार खेडकर, ओबीसी महिला मनीषा कीर्तने,शिलाबाई कीर्तने,कांताबाई कीर्तने,ताराबाई कीर्तने,इंदुबाई कीर्तने,गीताबाई कीर्तने,बायजाबाई कीर्तने,चंद्रभागा कीर्तने, कांताबाई कीर्तने,पारूबाई कीर्तने,विमल कीर्तने,लीलावती कीर्तने,सखुबाई कीर्तने यांच्यासह ओबीसी बांधव उपस्थीत होते.
पाच दिवस नागनाथ गर्जे यांनी उपोषण केले.गर्जे यांची वैद्यकीय तपासणी केली.त्यानंतर त्यांना पोटात दुखण्याचा त्रास जास्त झाल्याने उपचाराची गरज असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शुक्रवारी प्रांतअधिकारी प्रसाद मते, तहसिलदार उद्धव नाईक, पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी गर्जे यांची उपोषण स्थळी भेट घेतली. मते यांनी उपोषण थांबवावे अशी प्रशासनाच्या वतीने विनंती केली. दिलीपराव खेडकर यांनीही गर्जे यांना उपोषण थांबवावे असा सल्ला दिला. यावेळी मराठा समाज हा पुढारलेला वर्ग आहे. मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही. त्यांना ओबीसीमधे घेवु नये. आमच्यावर अन्याया करु नये अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरुन संघर्ष करु असा सुरु उपोषण कर्त्यांनी जाहीर केला. किसनराव आव्हाड यांनी आभार मानले.
0 Comments