मंथरेच्या भूमिकेने पाथर्डीचा विकास खुंटला – खा.सुजय विखे

पाथर्डी- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील महीला सक्षमीकरण करण्यासाठी आम्ही काम करीत अहोत. केंद्र व राज्य सरकारच्या योजना महीलांना देवुन महीलांच्या रोजगार निर्मीती सोबतच मुलांच्या शिक्षणासाठी चांगल्या सुविधा निर्माण करुन देण्याचे काम मी आणि आमदार मोनिकाताई राजळे करीत अहोत. रामायण काळापासुन मंथरा आपल्याला माहीती आहे. त्यामुळे या भागात मंथरेची भुमिका पार पाडणा-यांना ओळखा असे आवाहन खासदार डॉ.सुजय विखे यांनी केले आहे.

खरवंडी येथे संत भगवानबाबा विद्यालयात आयोजित हिरकणी लोकसंचलित साधन केंद्र पाथर्डी व उमेदच्या हिरकणी महीला प्रभागसंघाच्या वतीने स्वंयसहाय्यता सुमहाच्या महीलांना विविध वस्तु व कर्ज वाटप करण्यात आले. यावेळी राहुल राजळे, अभय आव्हाड, संजय बडे, तालुकाकृषी अधिकारी सुधीर शिंदे, नायबतहसिलदार भानुदास गुंजाळ, उमेदच्या तालुका व्यवस्थापक मेघा घोळवे, आण्णासाहेब मोरे, संजय किर्तने, दत्ता बडे, रशिद तांबोळी, योगेश अंदुरे, महादेव जगताप, माणिक बटुळे, आजीनाथ दराडे, भगवान दराडे, बाबासाहेब नांगरे, नितीन किर्तने, बंडुशेठ बोरुडे, बबन बुचकुल, हिरकणी महीला प्रभाग संघाच्या सचिव रंजना सावंत, वैशाली गर्जे, आशा बडे, माविमचे बाबासाहेब बांगर, भारती असलकर, हिरा माळवे , सतिष जगताप उपस्थीत होते.

यावेळी विखे यांनी प्रसार माध्यमावरही टिका केली. आम्ही ४५ कोटी रुपयाचे अपंगाना केंद्र सरकारच्या योजनेतुन साहीत्य वाटले. त्याचा गवगवा प्रसार माध्यमांनी केला नाही. भालगावच्या सभेत एका व्यक्तीने प्रश्न विचारले तेच दाखविले मी त्याला दिलेले नऊ कोटीचे विकास कामाची माहीती का दाखविली नाही. आम्ही चांगले करणारे माणसे अहोत. मोनिकाताई राजळे व केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना मधून  विकास केला आहे. बचत गटाच्या महीलांना घरातच बसुन रोजगार कसा उपलब्ध करुन देता येईल महीलांनी उत्पादीत केलेल्या मालाला बाजारपेठ कशी मिळेल यासाठी काम करु. मागील वर्षी बचत गटांना जिल्हा नियोजन मंडळातुन विस कोटीचा निधी दिला यावर्षी ३० कोटीची तरतुद करण्यात आली आहे. आम्ही कर्तृत्वावर ओळख निर्माण करणारे अहोत. तुम्ही मला मते दिले म्ङमुन मी हे करु शकलो. आता पुन्हा नरेंद्र मोदी मोदींना पंतप्रधान करण्यासाठी तुमचा आशिर्वाद असु द्या असे विखे म्हणाले. सरपंच प्रदीप पाटील अंदुरे यांनी प्रस्ताविक केले. अजय रक्ताटे यांनी सुत्रसंचालन केले. वंसत खेडकर यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments