यावेळी बोलताना न्यायाधीश व्ही.आय.शेख म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने लोकन्यायालयात दिवानी, फौजदारी, कौटुंबीक खटले लोक न्यायालयात सामोपचाराने निकाली काढले जातात. लोकन्यायालयातील न्याय निर्णय दोन्ही पक्षकाराला समाधान देणारा असतो. लोकन्यायालयालयातील न्यायनिवाडा अंमलबजावणी करण्यासाठी होणारा संघर्ष टाळला जातो व त्याचा फायदा पक्षकारांना होतो. पक्षकारांची कोर्ट फी शुक्ल परत मिळते. पक्षकारांचा वेळ व पैसा वाचतो असे सांगितले.
पाथर्डी न्यायालयातील लोकअदालती मध्ये दाखल एकूण ६४७६ प्रकरणे लोकअदालती मध्ये ठेवण्यात आली होती.दाखल पूर्व ६०७३ प्रकरणा पैकी २०७२ तर न्यायालयात दाखल ४०३ प्रकरणा पैकी ६० अशी एकूण २१३२ प्रकरणे सामोपचाराने निकाली निघाली असून सर्व मधून ३३ लाख ८८ हजार ३९८ रुपयांची प्रकरणे सामोपचाराने मिटली आहेत. न्यायालयात उशीरा मिळालेला न्याय हा अन्यायासारखा वाटतो. त्यामुळे आपसातील वाद हे सामोपचाराने मिटविले तर त्यातुन चागंले असे निर्माण होते. वादाने होणारी अधोगती टाळुन प्रगतीकडे वाटचाल करता येते. लोकन्यायालयाचा अनुभव चांगला असल्याची प्रतिक्रिया पक्षकारांनी व्यक्त केली.
यावेळी सहदिवानी न्यायाधीश व्ही.आय.शेख, अँड. राजेंद्र खेडकर, वैजीनाथ बडे, विठ्ठल कुटे, संदीप गर्जे, महेश खराडे, गणेश दानवे, श्रीकृष्ण वेलदे, अँड.हरीहर गर्जे, अँड अंबादास खेडकर,राजेश परदेशी, राजीव कुमार, जितेंद्र पोद्दार,पत्रकार राजेंद्र सावंत. अविनाश मंत्री, उमेश मोरगावकर यांच्यासह मोठ्या संख्येने वकील तसेच पक्षकार उपस्थीत होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश दानवे यांनी प्रस्ताविक केले.अँड.राजेंद्र खेडकर यांनी आभार मानले.
0 Comments