पाथर्डीतील त्या धुमश्चक्रीला अभय कोणाचे ?

 


पाथर्डी -  शहरात गुरुवारी सायंकाळी ५-३० वा ठेकेदारीच्या वादातून एका राजकीय पक्षाशी संलग्न असलेल्या कार्यकर्ता व ठेकेदारांमध्ये शाब्दिक चकमक होऊन त्याचे पर्यावसन तुफान हाणामारीत झाले, त्यांनतर एका गटाने ठेकेदाराच्या घरावर व नंतर उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जखमी ठेकेदारावर लाठ्या काठ्या घेवून हल्ला केल्याने शहरात काही काळ तणावाचे वातावरण पसरले होते.

गुरुवारी सायंकाळी पालिकेच्या वतीने विविध विकास कामांच्या उद्घाटनाची लगबग सुरु होती मात्र याच वेळी या ठिकाणी दोन जणांत मागील ठेकेदारीच्या वादातून शाब्दिक चकमक उडाली व त्याचे रूपांतर तुफान हाणामारीत झाले एकमेकांचे कपडे फाटू पर्यंत एकमेकांना भर रस्त्यावर लाथा गुद्दे अगदी फ्री स्टांइलने गुदागुद्दी व लोळवा लोळव झाली त्यांनतर उपस्थित पालिकेचे आजी माजी पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करून भांडण सोडविण्यासाठी प्रयत्न केले जखमी तरूण ठेकेदाराने पोलीस स्टेशन गाठले व घडलेली हकीगत पोलिसांना सांगितली. यानंतर पोलिसांनी त्याला पुढील औषध उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविले.मात्र याचवेळी दुसऱ्या गटाच्या कार्यकर्ता कम ठेकेदाराने भर चौकात जमाव केला व जमावाने लाठ्याकाठ्यासह जखमी ठेकेदाराच्या घरी जाऊन नातेवाईकांना शिवीगाळ करून धमकावले. मात्र जखमी ठेकेदार घरी नसल्याचे ठेकेदाराला गाठण्यासाठी राष्ट्रीय पक्षाच्या कार्यकर्त्याने जमवलेल्या बेकायदा जमावाने भर बाजारपेठेतून लाठ्याकाठ्या हातात घेऊन आपला मोर्चा उपजिल्हा रुग्णालयाच्या दिशेने वळवला. जखमीं ठेकेदारावर उपचार सुरू असताना संतप्त जमावाने सिव्हील हॉस्पिटल समोर आरडाओरडा करून शिवीगाळ करु लागल्याने रुग्णालयातील उपस्थित रुग्णांसह एकच गोंधळ उडाला व रुग्णालयामध्ये भीतीचे वातावरण पसरले.

ही बाब रुग्णालय प्रशासनाच्या लक्षात येताच तत्काळ हॉस्पिटलचे गेट बंद केले. याची माहिती बाजारपेठेत वाऱ्यासारखी पसरली व काही व्यापाऱ्यांनी घाबरून आपली दुकाने देखील बंद व बाजारपेठेत भीतीचे वातावरण पसरले होते. काही वेळातच पोलीस आल्यावर जमाव पांगला. त्यानंतर त्या ठेकेदाराला पोलीस बंदोबस्तात पोलीस ठाण्यात आणण्यात आले. रीतसर पोलिसात तक्रार दाखल करण्याचे काम सुरू असताना एका संस्था चालक कम लोकप्रतिनिधीचा पाथर्डीतील हस्तकाने येऊन घडलेल्या प्रकाराबाबत मध्यस्थी केल्याने प्रकरण तात्पुरते थांबले. मात्र या घडलेल्या प्रकरणाबाबत पाथर्डी शहरात उलट सुलट चर्चा सुरू असून पाथर्डीचे बिहार झाले आहे अशीच चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ॲड प्रताप ढाकणे यांनी जखमी ठेकेदाराच्या घरी भेट दिली यावेळी या बाबत पोलीसांनी ठोस भूमिका घेऊन कारवाई करण्याची मागणी करत शहरासह तालुक्यात भुमाफीया, वाळु माफीया,भूखंड माफिया यांची दहशत होती मात्र आता लोकप्रतिनीधीच्या डोळेझाक व पाठबळामुळे ठेकेदार माफीया तयार होत आहेत असा गंभीर आरोप प्रताप ढाकणे यांनी यावेळी केला. एवढी गंभीर घटना घडलेली असतानाही पोलिसांनी बघ्याची भूमिका घेत आपल्या अधिकाराचा वापर का केला नाही. असा सवाल ही ढाकणे यांनी यावेळी ढाकणे यांनी उपस्थित केला.

निवडणुकीच्या तोंडावर एवढा मोठा जमाव लाठ्या काठ्या घेऊन जर भर बाजारपेठेतून एखाद्या कुटुंबावर हल्ला करण्या साठी जात असेल तर ही बाब गंभीर आहे.शहरात चौका चौकात केमेरे बसवलेले असून त्याचे जिवंत चित्रीकरण पोलीस ठाण्यात दिसते तरी यावर काहीच कार्यवाही होत नाही त्यामुळे अश्या प्रकाराला व प्रवृत्तीला अभय मिळत आहे भविष्यात असे प्रकार मोठ्या प्रमाणावर घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे मात्र  या गैर प्रकाराला नेमके अभय कुणाचे आहे हा प्रश्न पाथर्डी कर विचारत आहेत.

Post a Comment

0 Comments